तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम अधिकारी !!मुख्यालयाच्या ठिकाणी कुजते ज्येष्ठांची कर्तबदारी ?

0
तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम अधिकारी !!मुख्यालयाच्या ठिकाणी कुजते ज्येष्ठांची कर्तबदारी ?

देवणी (प्रतिनिधी) गेल्या एक वर्षापासून तालुका पातळीवर दुय्यम दर्जाच्या अधिकारी काम करत आहेत, सुरुवातीला प्रभारी म्हणून आलेले हे अधिकारी इंग्रजाप्रमाणे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, त्या पद्धतीने प्रभारी म्हणून आले आणि कायमचे अधिकारी बनले. मात्र अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यामुळे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्यावर मात्र अन्याय होतो आहे.
देवणी येथे अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे. देवणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे चालू आहेत, याची पावती दस्तूर खुद्द नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने देवणी तालुक्यात टाकलेल्या मटक्यावरील धाडी आणि अवैध धंद्यावर केलेल्या कारवाया यावरून देवणी तालुक्यामध्ये ज्येष्ठ पोलीस निरीक्षक का आले नाहीत? किंवा त्यांना का येऊ दिले गेले नाही? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुका पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक असावेत, अशा पद्धतीचा संकेत आहेत, मात्र हे संकेत धाब्यावर बसउन दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून तालुका पोलीस स्टेशनला पाठवल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
देवणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे चालू असल्याची माहिती काढल्यानंतर देवणी (बु) येथील बसस्थानकासमोर डोंगरे कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट आणि बोरोळ चौकात ऑनलाइन लॉटरी, मटका बुकिंगवर एकाच वेळी विशेष पोलीस उपम निरीक्षकाच्या पथकांनी छापा टाकला होता.
या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि इतर अशा 13 जनाना जाब विचारत ताब्यात घेतले होते. या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम पंचवीस हजार तीनशे रुपये तसेच नऊ मोबाईल ज्याच्या अंदाजे किंमत 45 हजार रुपये आणि इतर ऑनलाईन लॉटरीचे साहित्य असा एकूण एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केला होता. देवणी हद्द ही अवैध धंद्याच्या प्रवेशद्वाराचे ठिकाण बनल्याने, अशा ठिकाणी अत्यंत कर्तबगार आणि सेवा जेष्ठ पोलीस निरीक्षकांची गरज आहे. अशी चर्चा आता राजरोसपणे चालू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!