सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी !

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी !

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य व पुण्यश्लोक अहिल्यादेवी बीएड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.

विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.असे मत संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी मांडले. यावेळी भाजपचे ता अध्यक्ष प्रा.हनुमंतराव देवक्तते,संचालक कुलदीप हाके,संचालिका सौ.शिवलीका हाके,प्राचार्य रुत चक्रनारायण, प्रा.माने कोंडीबा, साळुंखे आदींनी अभिवादन केले.

About The Author