एक महान योद्धा… प्रजाहित दक्ष, प्रभावशाली शासक राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन व बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर देखील अहिल्याबाईंनी धीर खचू दिला नाही. वैयक्तिक दुःखाचा प्रभाव त्यांनी प्रजेवर पडू दिला नाही.आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत. युद्ध प्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवीत असत.राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लुट, हत्या, या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाईं यशस्वी झाल्या. आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण, या क्षेत्रात उत्तम विकास झाला. असे मत संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी मांडले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष हनुमंत देवकते , संचालक अमरदीप हाके,सरपंच अजित खंदारे प्राचार्य नितीन शिवपुजे, उपप्राचार्य नागरगोजे स्वप्नील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड, कालिदास पिटाळे, सुहास दाहिटनकर, शेख तोहिद, गणेश यमगिर, निळकंठ नंदागवळे, महेश स्वामी, संग्राम कोपनर, संतोष लातूरे, मासोळे सिद्राम, विजय कुलकर्णी, बालाजी देवकते, सतीश केंद्रे, चव्हाण अशोक, केशव तोंडारे आदींनी अभिवादन केले.