अहमदपूरात 75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरूना युद्धा म्हणून सत्कार
अहमदपूर( गोविंद काळे ) येथील जिल्हा परिषद च्या सार्वजनिक मैदानावर महसूल प्रशासनाच्या वतीने 75 बा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस, नगर परिषद पंचायत समिती तहसील आणि शिक्षण विभागातील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, पंचायत समितीच्या सभापती गंगासागर जाभाडे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबकराव कांबळे, वीरमाता मधू मालती दिलीप केंद्रे, डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, सह विविध पक्षाचे पदाधिकारी पुढारी स्वातंत्र्यसैनिक सहशिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापुरे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.