संत ज्ञानेश्वर विद्यालय व इनरव्हील क्लब यांच्या वतीने नागपंचमी निमित्त सर्प विषयक ऑनलाईन प्रबोधन
अहमदपूर (गोविंद काळे) : संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर व इनरव्हील क्लब अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त सर्प विषयक ऑनलाईन प्रबोधन घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डॉ.वर्षा भोसले तर प्रमुख पाहुणे प्राचार्या रेखाताई तरडे-हाके उपस्थित होत्या. सर्पमित्र हेमंत धानोरकर, अंबाजोगाई यांनी सापांविषयी माहिती सांगितली.त्यामध्ये विषारी, बिनविषारी साप कोणते?तसेच सापाचे अन्न,सापांपासून औषध तयार केली जातात.सापांविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच साप चावल्यास कोणती दक्षता घ्यावी, परिसरात आढळणारे व जंगलात आढळणारे साप त्यांची नावं व जाती सांगितले. विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करून खूपच छान मार्गदर्शन व प्रबोधन केले.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले तर सूत्रसंचालन संस्कृती पलमटे यांनी केले पाहुण्यांचा परिचय आरती मुंडे यांनी करून दिला तर उपस्थितांचे आभार विश्वजित ढोले यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात प्रणिता झरीकुंटे यांनी नागपंचमीच्या गीताने केली तर सांगता कलावती भातांब्रे यांनी राष्ट्रगीताने केली. यावेळी डॉ.भाग्यश्री येलमटे, प्रेमा वतनी, उषा गोजमे, सचिव विजया भुसारे,संजय टाळकुटे, शिवकुमार देवनाळे, सुहास शेटकार सह विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.