सक्षम व बलवान देश बनवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वातंत्र्यप्राप्ती साठी आपल्या पूर्वजांनी अतिशय कष्ट घेतले,त्रास सहन केला,अनेक प्रकारचे छळ सहन केले पण स्वातंत्र्याचा अट्टाहास कधीही सोडला नाही. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आज ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा होताना भारत एक बलवान राष्ट्र व्हावे,सक्षम देश व्हावा म्हणून आपण सारेच जण प्रयत्नशील असावे म्हणजे बलवान व सक्षम राष्ट्रासाठी सर्वांचे योगदान असावे असे प्रतिपादन गणेश हाके यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ पार्वतीबाई देवीदास सुरनर, पंचायत समितीचे माजी उपसभापती देवीदास सुरनर, विस्तार अधिकारी बालाजीराव शिंदे,माजी केंद्रीय मुख्याध्यापक दिलीप कापसे, उपसरपंच लहु राठोड, सुग्रीव कांबळे, विनायक ढवळे,अर्जून राठोड,बालाजी हेमनर,विनायक ढवळे,खय्युम सय्यद, आकाश सांगवीकर, परमेश्वर पाटील,पोपा साहेबराव राठोड, ज्ञानोबा पारसेवार, अनिल व्हडगीर, वसंत परतवाघ, सय्यद मुस्तफा, डॉ नरवाडे, देवबा कांबळे,राजीव सूरनर, रघुनाथ तुरेवाले,ग्रामसेवक गोपाळ गुट्टेवाडीकर,नरसिंगराव सांगवीकर, बालाजी कांबळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विज्ञान शाखेतून कासले माहेश्वरी विकास,केंद्रे ऋतुजा दत्तात्रय,तळेगावे वैष्णवी विठ्ठल तर कला शाखेतून पारसेवार स्वप्नजा ज्ञानोबा, गायकवाड पल्लवी पिराजी,परतवाघ अस्मिता वसंत यांचा सत्कार करण्यात आला तसेच अहिल्या परिवारातील शिक्षकांच्या पाल्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.ज्यात बारावीतील आदिती आनंद लोहकरे(९०%),श्वेता शिवाजी जवणे (९०%),तर मेकॅनिकल बीई अंतिम परीक्षेत शेख मोहम्मद दानिश आ.खा.जिलानी(९.८९) यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
तसेच ग्रामपंचायत सांगवी यांच्यामार्फत सांगवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्यात विज्ञान शाखेचे प्रथम दोन कला शाखेचे प्रथम दोन सूरनर जयराम व सुरनर दिपाली तर दहावीतील प्रथम व्हडगीर योगेश अनिल व द्वितीय सुरनर अभय विश्वंभर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी बालाजीराव शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर ग्रामपंचायतीच्या वतीने विनायक ढवळे यांनी उपस्थितांना सत्काराचे महत्व सांगत इयत्ता दहावी च्या प्रथम दोन विद्यार्थ्यांना एक वर्षासाठीचे शालेय साहित्य देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेख जिलानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुर्ले राजाराम,देवकते कौशल्या, मासोळे जनार्धन,शिंगडे तुकाराम, रेड्डी प्रदीप,सारोळे अमोल,मुळे संतोष,चेपूरे रमेश,सुरनर अच्युत,दुर्गे संभाजी, शिंदे दैवशाला,गिरी चिंतन, गणेश जाधव, गजानन फुलारी,गोगडे मिनल,निर्गुळे अनिता, देशमुख धनंजय,शेख हिदायत, विश्वंभर सुरनर, विवेकानंद सूरनर आदींची उपस्थिती होती.