कर्ज वाटपात बॅकाकडून होणारी अडवणूक दूर करा..!

कर्ज वाटपात बॅकाकडून होणारी अडवणूक दूर करा..!

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ.भागवतजी कराड यांच्याकडे मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज वाटप प्रकरणी संबंधीत बॅंका कडून नागरीकांची सातत्याने होणारी अडवणूक थांबवून जलद गतीने कर्ज मंजूरी बाबत बँकांना आदेशीत करावी अशी आग्रही मागणी युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांच्या कडे केली आहे. दिल्ली येथे डाॅ.भागवत कराड यांची भेट घेवून त्यांनी मागण्याचे निवेदन दिले.या निवेदनात पूढे म्हटले आहे की,लातूर जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅकाकडून कर्जवाटपात जाणीवपूर्वक अडवाअडवी केली जात असल्याच्या नागरीकांच्या अनेक तक्रारी आहेत. कर्ज प्रकरणासाठी लाभार्थ्यांना बॅकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. शासनाने जनतेसाठी विविध शासकीय योजना जाहीर केल्या आहेत मात्र केवळ बॅकांच्या असहकार्यामूळे कर्ज प्रकरणे प्रलंबीत आहेत.शासनाने नेमून दिलेले उद्दीष्ट सूध्दा वेळेत पूर्ण केले जात नाहीत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज,व्यापाऱ्यांना व सुशिक्षीत बेरोजगारांना उद्योगधंद्यासाठी कर्जे, मूद्रा योजना, विविध मागासवर्गीय महामंडळे,दिव्यांगाच्या कर्जाच्या योजना, महिला बचतगटे, वैयक्तिक कर्ज योजना आदी कर्जाची प्रकरणे दाखल केली जातात.मात्र नियमात असून सूध्दा असे कर्ज मंजूर करण्यासाठी बॅकाकडून टाळाटाळ होत आहे.या सर्व घटकांना कर्जे वेळेत मिळाल्यास मोठी मदत होणार असून शासनाच्या योजना खर्या गरजू पर्यंत पोचन्यास मदतच होणार आहे. ही सर्व परिस्थीती लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रलंबीत कर्ज प्रकरणाचा आढावा घेवून पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांना तातडीने मंजूरी देण्याबाबत आदेशीत करावे अशी मागणी डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केली आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे अश्वासन राज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांनी दिले आहेत.

About The Author