लातूर येथे केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करा.!!
डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची प्रधानमंत्री कार्यालयाकडे मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे केंद्र शासनाच्या वतीने शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करावी अशी आग्रही मागणी यूवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे दिल्लीत येथील पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,लातूर जिल्हा हा शिक्षण क्षेत्रात अतिशय अग्रणी जिल्हा म्हणून ओळखला जातो.शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे शिक्षणाचा स्वतंत्र लातूर पॅटर्न देशामध्ये प्रसिध्द आहे.या ठिकाणी केंद्रीय विद्यापीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या ठिकाणी राज्य शासनाचे सर्व महत्वाच्या विभागाची प्रमुख कार्यालये असून रेल्वे व हवाई मार्गाने जिल्हा कनेक्ट आहे.केंद्रीय विद्यापीठासाठी आवश्यक सर्व बाबी लातूर जिल्हा पूर्ण करतो.या सर्व बाबींचा विचार करून लातूर येथे तातडीने केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्यास मंजूरी देवून यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करण्याची विनंती करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन केंद्रीय शिक्षा मंत्री,शिक्षा राज्यमंत्री,तसेच विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.