मन्याड नदीवरील बॅरेजसला विशेष बाब म्हणुन मंजूरी
आमदार बाबासाहेबपाटील यांच्या प्रयत्नाला यश
शिरुर ताजबंद (गोविंद काळे) : मन्याड नदीवरील कोल्हापूरी बंधार्याचे बॅरेज मध्ये रूपांतर करण्यास जलसंपदा विभागाने विशेष बाब म्हणुन मंजूरी दिल्याची माहीती आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली. सध्या अहमदपूर – चााकुर तालुक्यात तलाव करण्यासाठी नदी किंवा साईट उपलब्ध नाही म्हणुन कामे थांबायची का ? अहमदपूर विधानसभा मतदार संघात बारमाही वाहणार्या मोठी नद्या नसल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मर्यादा येत असून शेतीसाठी पाणी आवश्यक आहे म्हणुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे मन्याड नदीवरील कोल्हापुरी बंधार्याचे बॅरेजमध्ये रूपांत करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली होती.मागणी करून न थांबता त्याचा पाठपुरावा करत असताना संवाद यात्रेच्या निमित्ताने शिरुर ताजबदला ना. जयंत पाटील आल्यावर ना.पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत या बंधार्याचे बॅरेज मध्ये रुपांतर झाले तर शेतकर्यांना शेतीकरिता पाण्याची सोय होणार असून पावसाळ्यातील वाहून जाणार्या पाण्यामुळे अनेक शेतकर्यांना हजारो हैक्टर क्षेत्रावरील जमिनीला पाण्याचा उपयोग होईल अशा प्रकारची माहीती ना.पाटील यांना दिली. ना.पाटील शब्द दिला कि होता मन्याड नदीवरिल बंधार्याचे बॅरेजमध्ये रुपांतर विशेष बाब म्हणुन मंजूर करण्यात येईल अशा प्रकारचा शब्द दिला होता, त्याचे फलीत म्हणुन जलसंपदा उपसचिव वैजनाथ पिल्ले यांनी कार्यकारी संचालक,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास, औरंगाबाद यांना लेखी पत्र देवून सदरील बंधार्याचे बॅरेज रुपांतर करण्यासाठी मन्याड उर्ध्व मानार प्रकल्पाच्यावर कोपरा साठवण तलावाच्या खालील बाजूस नदीत ४० किमी लांबीमध्ये जिल्हा परिषद लातूर यांनी बांधण्यात आलेल्या ९ कोल्हापुरी बंधार्याचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्यासाठी मान्यता देण्यात आली असल्याचे पत्र कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास ,औरंगाबाद यांना दिल्याची माहीती आमदार पाटील यांनी देवून ना.जयंत पाटील यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविल्याने बॅरेजच्या आजूबाला असलेल्या शेतकर्यांच्या जीवनात हरित क्रांती होण्यासाठी व शेतीला कायम स्वरुपी पाणी पुरवठा होण्याकरिता या बॅरेजमुळे मदत होणार असल्याची माहीती आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.