लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. बाबासाहेब पाटील यांनी मतदार संघातील विविध प्रश्न मांडले

लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. बाबासाहेब पाटील यांनी मतदार संघातील विविध प्रश्न मांडले

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री मा.अमित विलासरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील विविध प्रश्न आमदार बाबासाहेब यांनी मांडले. यावर पालकमंत्र्यांनी सर्व प्रश्नमार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

खालील मुद्दे बैठकीत मांडले.

अहमदपूर विधानसभा मतदार संघातील म.रा.वि.वि.कं. मर्या.च्या खालील कामांना जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजुरी देणे.

1) वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत अहमदपूर चाकूर तालुक्यातील निधी मिळणे बाबत.

2) मो.शिरुर ताजबंद ता.अहमदपूर येथील पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी -1 कर्मचारी निवास्थान बांधकामास जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी मंजूर करणे बाबत.

3) मौ.शिरुर ताजबंद ता.अहमदपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नविन इमारत बांधकामास जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी मंजूर करणे बाबत.

4) मौ.शिरुर ताजबंद ता.अहमदपूर येथील मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीस जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी मंजूर करणे बाबत.

5) अहमदपूर विधानसभा मतदार संघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यातील पाझर तलाव दुरूस्तीच्या व नविन सिमेंट नाला बंधारे च्या कामास जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूरी देणे बाबत.

6) अहमदपूर विधानसभा मतदार संघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यातील पालकमंत्री पांदण मुक्ती योजने अंतर्गत शेत / पाणंद रस्त्यांचे माती कामास मंजूरी देणे बाबत.

7) अहमदपूर व चाकूर तालुक्यातील शासकीय इमारती मध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी मंजूर करणे.

8) अहमदपूर तालुक्यातील पावसाअभावी सोयाबीन सुकत त्याचे त्वरित पंचनामे करावेत.

जनसुविधा योजने अंतर्गत खालील कामास मंजूरी देणे

1) अहमदपूर विधानसभा मतदार संघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यातील डिपीडिसी योजने अंतर्गत शेत /पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणाच्या कामास मंजूरी देणे.

2) अहमदपूर नगर पालिका अंतर्गत जिल्हा नियोजन समिती मार्फत नाविण्यपुर्ण नगोरोथान योजनेतून कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देणे.

3) अहमदपूर विधानसभा मतदार संघातील गावांना जिल्हा नियोजन समिती अंतर्गत व्यायाम शाळा व क्रिडांगणासाठी निधी मंजूर करुन देणे.

4) कुमठा उपकेंद्र अंतर्गत वायगाव साठी स्वतंत्र फिडर काढलेले होते. त्याचे काम अपूर्ण आहे. ते काम पूर्ण करावे

5) ढाळेगाव, सुनेगाव, खंडाळी, येस्तार, अंधोरी काळेगाव येथील एअर बंच केबलचे 03/09/2020 मध्ये मंजूर झालेले काम चालू करावे.

6) महावितरण कडून सतत ट्रान्सफार्मर वेळेवर देण्यात यावे.

7) शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पिक विमा मिळाला पाहिजे.

8) झरी बु. ता.चाकुर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता देण्यात यावी.

9) सावरगाव रोकडा ता.अहमदपूर येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मान्यता मिळावी.

10) अहमदपूर व चाकूर तालुक्यातील शासकीय इमारती मध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी मंजूर करावा.

11) अहमदपूर व चाकूर तालुक्यातील पाझर तलाव दुरूस्तीच्या व नविन सिमेंट नाला बंधारे च्या कामास जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूरी देणे.

12) अहमदपूर व चाकूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नविन इमारत बांधकामासाठी निधी देण्यात यावा.

तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पावसाअभावी सोयाबीन पीके वाळत आहेत. या विषयी तात्काळ पंचनामे करावेत यासाठी पालकमंत्री अमितजी देशमुख आणि जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांना विनंती केली. याप्रसंगी राज्यमंत्री मा. श्री. संजय बनसोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

About The Author