धम्मदिक्षा बौद्ध विहार येथे महीला संघाच्या वतीने ग्रंथ वाचन सुरू

धम्मदिक्षा बौद्ध विहार येथे महीला संघाच्या वतीने ग्रंथ वाचन सुरू

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील इंदिरा नगर येथे वर्षावासानिमीत्त २४ जुलै अर्थात गुरू पौर्णिमेपासून “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे ग्रंथवाचन अविरत पणे सुरू आहे.उपासिका अंजलीताई वाघंबर, शेषेराव ससाणे , बाबासाहेब वाघमारे, आशाताई कांबळे यांच्या संकल्पनेतून या स्तुत्य उपक्रमास सुरुवात करण्यात आली.उपासिका अंजलीताई वाघंबर यांच्या मंगलवाणीतुन ग्रंथ वाचन सुरू आहे. या स्तुत्य उपक्रमास वंचित बहुजन आघाडी च्या महीला तालुका अध्यक्षा आशाताई कांबळे व यांच्या सर्व सहकारी भगिनी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे. दररोज नियमितपणे धम्मभगींनी संध्या भालेराव,जाईबाई सोनकांबळे,अहील्याबाई वाघमारे, चंद्रकलाबाई वाघमारे,सागरबाई होळकर, लक्ष्मीबाई ढवळे, मनिषा तलवार, रेखाताई कांबळे,पुजा मोटे, प्रिती वाघमारे, काशीबाई गायकवाड, प्रज्ञा बनसोडे,छायाबाई ढवळे, रेखाताई भालेराव, रुक्मिणीबाई जाधव, मनिषा माने, सुनिता सोनकांबळे, गेंदाबाई कांबळे, आम्रपाली महालिंगे यांच्या सह अनेक उपासिका व बालकांच्या उपस्थितीत ग्रंथ वाचन सुरू आहे. धम्मदिक्षा बौद्ध विहार इंदिरा नगर हा परिसर कष्टकरी, कामगार, मजुरी करून आपली उपजीविका करणाऱ्या समुहातील कुटुंबाची संख्या अधिक असलेला आहे.खरं तर येथेच धम्माच्या संस्काराची, शिकवणुकीची आवश्यकता आहे कारण अशा ठिकाणी अंधश्रद्धा निर्मुलन होणं काळाची गरज आहे. लहान मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.या उपक्रमास सरस्वतीबाई कांबळे, शाहुताई कांबळे, सावन कदम, उत्तम कांबळे, अमोल तलवार, शुभम कांबळे, सुवर्णेश कांबळे, अभंगराव होळकर, माधव जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

About The Author

error: Content is protected !!