बॅरेजसला परवानगी; आमदार बाबासाहेब पाटील यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार कर

बॅरेजसला परवानगी; आमदार बाबासाहेब पाटील यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार कर

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मन्याड नदी प्रकल्पाच्या 9 कोल्हापूरी बंधा-याचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्याची प्रकिया आणि विस्ताराकरिता तत्वतः मान्यता मिळाली आली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या कामाला परवानगी मिळाल्याबद्दल तालुक्यातील कोपरा, धानोरा, शेनकुड, टाकळगाव, सोनखेड, मानखेड, मावलगाव, सोरा, चिलखा, तांबटसांगवी, सुनेगाव शेंद्री, रुद्धा, येथील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बाबासाहेब पाटील यांचा सामूहिक सत्कार केला. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रामुख्याने जास्तीत जास्त विकास कामावर भर दिला. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची टंचाई भासत होती. हाच प्रश्न लक्षात घेऊन जलसंपदामंत्री मा.ना.जयंत पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आता बॅरेजस मध्ये रूपांतर करण्याची परवानगी मिळाली आहे असे यावेळी मनोगत व्यक्त केले.

About The Author