कमला नेहरू विद्यालयाचे निबंध स्पर्धेत घवघवीत यश

कमला नेहरू विद्यालयाचे निबंध स्पर्धेत घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील कमला नेहरू विद्यालयामध्ये ‘टाटा बिल्डींग इंडिया स्कूल निबंध स्पर्धा’ शालेय स्तरावर आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सदरील विद्यालयातील विद्यार्थ्यांने सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना टाटा बिल्डींग इंडियाच्या वतीने कु. वाघमारे कोमल, कु.सोनकांबळे अक्षता, कु.कांबळे मेघा, चि. प्रशांत आनंतवाड, कु. श्वेता सोनकांबळे कु. पिंजारी सानिया इ. विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव मा. शिवानंदजी हेंगणे यांच्या शुभ हस्ते व संस्था अध्यक्ष आशिष हेंगणे , अॅड. भारतभुषण क्षीरसागर, बाबुराव चौधरी, चंद्रकांत पागे, सय्यद सलीम, बाबुभाई रुईकर, कोंडापूरे सर, अॅड. पौळ, नागेश गुडे, सूर्यकांत गुडे, मनमथ उपे, हुशेन कासार,सौ. शाहूबाई कांबळे, सौ.लता मदने , शाळेचे मुख्याध्यापक श्री मधुकरराव मदने व शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!