भक्ती स्थळ येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते आरती

भक्ती स्थळ येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते आरती

अहमदपूर (गोविंद काळे) : भक्ति स्थळ, अहमदपूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तिस्थळ कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांबतात्या महाजन यांची तर कार्यकारी मंडळाच्या सचिवपदी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात करून शुभेच्छा दिल्या. व तसेच येथील विश्वस्त मंडळाच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भक्तिस्थळ कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष वसंतराव शेटकार, अॅड. भारतभूषण क्षिरसागर साहेब, माजी उपसभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर, माजी सरपंच सतिशराव नवटक्के, अॅड. सुहास पाटील यांच्यासह पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!