तीर्थ येथे 10 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ..!
अहमदपूर (गोविंद काळे) : मतदारसंघातील मौजे तीर्थ येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 7 लक्ष रूपये सभागृह आणि 3 लक्ष रूपये पेव्हरब्लॉक साठी अशा एकूण 10 लक्ष रूपयांच्या विकास कामाचे उदघाटन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. मतदारसंघात विकास कामांना वेग आला आहे. लवकरच सर्व कामे पूर्णत्वास जातील असे यावेळी ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. उत्तम महाराज धानोरकर, सभापती शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि.प. सदस्य माधवराव जाधव, अभियंता शेख, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, संचालक शाम पाटील, सरपंच सौ.कमलबाई वाघमारे, उपसरपंच नितीन पाटील, मोघा सरपंच कदम, आर.आर. पाटील, बळीराम मुळे, पोलीस पाटील बबन पेड, अर्जुन पेड, व्यंकोबा पेड, बबन पाटील, साहेबराव गंगथडे, सुधाकर पाटील, माधवराव नाखसाखरे, लक्ष्मण मुळे, मनोहर पाटील, पुंडलिक पेड यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.