डॉ. वैशाली झनकर यांच्या कोठडीत वाढ; मोठ्या कारवाईची शक्यता

डॉ. वैशाली झनकर यांच्या कोठडीत वाढ; मोठ्या कारवाईची शक्यता

नाशिक (दत्तू वाघ ) : लाचखोरीच्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जाबाबत त्यानंतरच विचार करण्यात येणार आहे. दरम्यान, झनकर यांचं निलंबन अटळ मानलं जात आहे. 

डॉ. वैशाली झनकर यांना शुक्रवारी सकाळी एसीबीने अटक केली. यानंतर त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. जिल्हा कोर्टाने दिलेल्या कोठडीची मुदत शनिवारी (दि.१४) संपल्याने त्यांना जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एसीबीने आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली. तर, बचाव पक्षाने सुद्धा आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने वैशाली झनकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. एसीबीच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. झनकर यांनी आपला जामीन अर्ज सादर केला असून पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरच त्यावर सुनावणी होऊ शकते. ठाणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून बसले असून, झनकरांची चौकशी सुरू आहे.

२० टक्के अनुदान मंजूर असल्याने सुधारित नियमानुसार वेतन करण्याची परवानगी देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांसह प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दशपुते आणि येवले न्यायालयीन कोठडीत असून, डॉ. झनकर पोलीस कोठडीत आहेत. वाहनचालक येवले याला शुक्रवारी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी निलंबित केले. तर, दशपुते याच्या निलंबिताचे आदेश शनिवारी (दि.१४) काढण्यात आले. दरम्यान, डॉ. झनकरांवरील शिस्तभंग आणि निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे प्रलंबित आहे. मात्र, मंगळवारी (दि. १०) लाच स्वीकारल्यानंतर चार दिवसांपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कोणीही प्रभारी अधिकारी नियुक्त झालेले नाहीत. डॉ. झनकरांच्या निलंबनाचे आदेश निघतील त्यातच, नवनियुक्त शिक्षणाधिकारी अथवा प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

डॉ. वैशाली झनकर वीर यांना यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शासकीय अधिकारी ४८ तास कोठडीत राहिल्यानंतर त्यांचे निलंबन अटळ असते. त्यानुसार निलंबनाच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसला, तरी मंगळवारपर्यंत (दि.१७) शिक्षणाधिकारी झनकरांचे निलंबन होणार, हे अटळ असल्याची माहिती शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!