वृक्षाची आई वडीलासारखे संगोपन करू – सयाजीराव शिंदे

वृक्षाची आई वडीलासारखे संगोपन करू - सयाजीराव शिंदे

झाडांचे शतक! शतकांसाठी झाड हा सह्याद्रि देवराई चा कार्यक्रम नागराळ मध्ये साजरा

नागराळ (रामेश्वर बिरादार) :  स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून नागराळग्राम पंचायत तर्फे झाडांचे शतक! शतकांसाठी झाड, हा सह्याद्रि देवराई चा कार्यक्रम पार पाडण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली व त्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक वयाचे 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी  निसर्गप्रेमी,सिनेअभिनेता सह्याद्री देवराई चे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव शिंदे यांनी नागराळकरांना एक मोलाचा संदेश देत म्हणाले की, आपणास जगण्यासाठी सर्वात मोठे साधन म्हणजे ऑक्सिजन आहे. हेच आपण निर्माण करू व गावात वृक्ष लागवडीचे शतक पूर्ण करू. त्या वृक्षांसोबत आपलं शतक ही पूर्ण करू, आपन जे वृक्ष लागवड करू त्या वृक्षांच संगोपन आपण आपल्या आई वडीलासारखे करू. अभंगरुपी काव्यातूनमधून एक संदेश देत म्हणाले की “ऐसी लेखणी घेऊन सोबती! माती जमा करून!त्या मातीत पाणी ओतूनि! त्या मातीचा गोळा करूनि! त्या गोळ्यास लाथा घालूनि! त्यात पीक घेऊनि वृक्ष लावूनी!त्या वृक्षाची लाकूड फाटा घेऊनी!त्याचाच छपर बनऊनी! स्वतः ला राहण्यासाठी सावली बनवुनी!!!! सावलीसाठीचे वृक्ष सावली साठीच वापरणे हीच खरी वृक्षाची देण म्हणत  झाड लाव झाड लाव आई साठी झाड लाव, बापासाठी झाड लाव, बायको साठी झाड लाव, मूलबाळ साठी झाड लाव, झाड लाव म्हणत ते थांबले” प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी गावाचा विकास होण्यासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. व दुष्काळ पडू देणार नाही असे आश्वासन दिले.  गावातून वृक्ष दिंडी घेऊन नागराळ फॉरेस्ट डिपार्टमेंट हद्दीतील  वनीकरण विभागतील वनात तिरंगा ध्वज फडकविला. वृक्ष लागवड करून पत्रकारांशी संवाद साधला. त्या नंतर दिलीप पाटील नागराळकर यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रम सांगता केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचटनिस बसवराज पाटील नागराळकर,मल्लिकार्जुन मानकरी,रमेश आण्णा आंबरखाने,चंद्रकांत आण्णा वैजापुरे, शिवाजी मुळे, श्रीकांत पाटील, शरण लुल्ले, कपिलकुमार बिरादार, डोंगरगे सीध्देश्वर आप्पा नागराळकर, अनिल इंगोले, अनिल कांबळे, सरपंच विष्णू ऐनिले,उपसरपंच रतन पाटील, ग्रामसेवक ईश्वर मुर्के,ग्रामपंचायत सर्व सदस्य, रामेश्वर बिरादार, गिरीधर गायकवाड, भास्कर चामले, दयानंद कांबळे, मदार शेख, सुरेश गौडगावे, पंढरपुरे रत्नदीप व  गावातील नागरिकांसह बाहेर गावातील हजारो नागरिक या कर्यक्रमासाठी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!