जि.प. प्रा. शाळा मौजे रुद्धा येथे स्वातंत्रदिन सोहळा उत्साहात साजरा
अहमदपूर( गोविंद काळे ) : 75 वा स्वातंत्रदिन सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्धा ता.अहमदपूर येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साके मॅडम, श्री माने सर, श्री दाभाडे सर, श्री नाईनवाड सर रुद्धा नगरीच्या सरपंच सौ.वंदनाताई केंद्रे, उपसरपंच श्री बालाजी मामा सुरणर, ग्रा.पं. सदस्य बलभीम मामा देवक्तते, जेष्ठ नागरिक श्री विश्वनाथ गुरुजी केंद्रे, श्री काशिनाथ गुरुजी केंद्रे, श्री बालाजी मामा केंद्रे शालेय समिती अध्यक्ष श्री मारोती सुरणर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन करून साजरा करण्यात आला.
आलेल्या सर्व ग्रामस्थांचे सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरवात केली. जि.प.प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साके मॅडम यांनी आपल्या शाळेच्या आवारात गावातील काही रिकामी टेकडी व ज्यांना शाळेची आवड नाही अश्या मुलांकडून शाळेची नुकसान होत आहे. शाळेमध्ये गोट्या खेळणे, मद्यपान करणे, पत्ते खेळून गुटखे खाऊन कोपरे व भिंतीवर कुलूप वर थुंकणे अश्लिल भाषेत मोठं मोठ्याने बोलणे शाळेतील लावलेले वृक्षांची मोडतोड करणे असे प्रकार आपल्या शाळेत होत आहेत तरी ग्रामपंचायत सरपंच मॅडम यांना विनंती करून शाळेला केलेली संरक्षण भिंत आहे परंतु त्याला गेट नाहीये म्हणून 15 व्या आयोगातून शाळेला गेट करून घ्यावे अशी मागणी केली. पुढे बोलताना मुख्याध्यापिका सौ. साके मॅडम म्हणाल्या शाळेचे सुशोभिकरण करून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. शाळेला लागणाऱ्या भौतिक व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात….
यानंतर रुद्धा नगरीचे सुपुत्र श्री बालाजी मामा केंद्रे यांनी बोलताना सांगितले की केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे या प्रमाणे आपण सर्वांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेला कमी पडू देणार नाही असे अहवान केले. त्यानंतर मी श्री युवराज भगवानराव बदने ग्रा.पं. सदस्य म्हणून बोलताना एवढेच सांगितले की गावामध्ये चांगले नागरिक आहेत आणि आपली शाळा सुशोभीकरण करण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला गाव आपल्या सोबत आहे. मी शाळेचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. गावातील मुख्य अडचण म्हणजे गावातील लेंडी रस्ता व नदीवरील होणारा बंधारा या होत्या पण आज तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने या दोन्ही मुख्य मागण्या पूर्ण झाल्या आहेत. म्हणून गावचा विकास व आध्यात्मिक विकास चांगला झाला आहे म्हणून आता गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्धा यांचा विकास करून ज्ञानात्मक विकास करण्यासाठी पाठपुरावा करत राहीन आणि लवकरच शाळेची भौतिक सुविधा व सुशोभीकरण करून घेण्याचा प्रयत्न करेन. व शाळेच्या आवारात करत असळलेल्या नुकसणावर आळा घालण्याचा प्रयत्न करेन. यानंतर रुद्धा नगरीच्या सरपंच सौ.वंदनाताई केंद्रे मॅडम यांनी बोलताना सांगितले की शाळेच्या बाबतीत मी सदैव तत्पर राहून काम करत आहे यानंतर पण शाळेच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या मी लवकरच पूर्ण करेन आणि मुख्याध्यापिका सौ.साके मॅडम यांनी जी विनंती केली की शाळेला गेट बसून द्या तर तो गेट मी 15 व्या आयोगातून लवकरच बसवण्याचे वचन देत आहे आणि सर्व शिक्षक वृंद यांना कोरोना काळात पण चांगले कार्य केल्याबद्दल त्यांचे शब्दरुपी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन चा भार श्री दाभाडे सर यांनी घेऊन कार्यक्रमास आलेल्या सरपंच उपसरपंच ग्रा.पं. सदस्य गावकरी यांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साके मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने चहा पाण्याचा कार्यक्रम केला….