अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या अध्यक्षपदी डॉ.धिरज देशमुख यांची निवड

अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या अध्यक्षपदी डॉ.धिरज देशमुख यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी डाॅ.धिरज देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या सहायक पोलिस निरीक्षक अध्यक्षस्थानी तर आगार प्रमुख शंकर सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. शासकीय विश्रामगृहात राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रकाश घादगीने, रमेश माने, वसंत टेंकाळे, निशिकांत मिरकले यांच्या उपस्थितीत नुतन कार्यकारीणी पदाधिकारी निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे.कार्याध्यक्ष –  मेघराज गायकवाड, प्रधान सचिव – प्रा.रत्नाकर नळेगावकर, उपाध्यक्ष – चंद्रशेखर भालेराव, बुवाबाजी संघर्ष  – दस्तगीर शेख, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प – प्रा.उमाकांत चलवदे, कायदेविषयक सल्लागार अॅड एन.एम देमगुंडे. वर्तापत्र व प्रकाशन विभाग  –  भागवत येणगे, सांस्कृतिक विभाग -अजहर बागवान. गोपाल पटेल, मानसिक आरोग्य विभाग  – डाॅ जयप्रकाश केंद्रे, गणेश सुर्यवंशी, विविध उपक्रम विभाग – उद्धव इप्पर,गणेश कोदळे प्रशिक्षण विभाग – इम्रोज पटवेगर, रामराव केंद्रे सोशल मेडिया  – शिवाजी गायकवाड, उदयकुमार गुंडीले, जात निर्मुलन व विवेकी जोडी विभाग  – रूद्रा मुरकूटे, युवा व विवेक वाहिनी – संदिप गायकवाड,राहूल गायकवाड महिला विभाग डाॅ भाग्यश्री यलमटे , पुजा गायकवाड, शुभांगी खेडकर, सुरेखा उप्परवाड, अंजली वाघंबर, यास्मिन ताबोळी,वैशाली कदम तर मार्गदर्शक म्हणून डाॅ.चंद्रकांत उगीले, मोहीब कादरी , प्रा.गोविंद शेळके, डाॅ प्राचार्य वसंत बिरादर,प्रशांत घाटोळो महेंद्र खडागळे, प्रशांत घाटोळो यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून येथील माजी सैनिक अशोक लांडगे व विठ्ठल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. 

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!