भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरातील लातूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अमित रेड्डी यांच्या काॅपल्याक्स मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या हस्ते देशाचे संरक्षण करून सेवा निवृत्त झालेल्या 25 सैनिकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी देवेंद्र देवणीकर, बाबुराव बावचकर, उपनगराध्यक्ष सौ.मिनाक्षी रेड्डी, सभापती सौ.गंगासागर जाभाडे,लक्ष्मीकांत कासनाळे, अमित रेड्डी, राहुल शिवपुजे, रामभाऊ बेल्लाळे, नीलकंठ पाटील, राजकुमार खंदाडे, शिवराज पाटील, गोविंदराव गिरी, अतुल रेड्डी, नागेश भुतडा, देवानंद मुळे, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, ज्ञानोबा बडगिरे,बाळासाहेब लखनगिरे, जगन्नाथ मामडगे,सौ.शशिकला मामडगे,बाशिदखाॅ पठाण, अजमोदीन खुरेसी, पांडुरंग गलाले, संजय मुसळे,बबलू पठाण, राजू रेड्डी,संगम कुमदळे, प्रशांत जाभाडे, अमोल पाटील, अमोल राठोड यांच्या सह सेवानिवृत्त कर्नल, सुभेदार, मेजर, नाईक, हवालदार यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सेवा निवृत्त सैनिक संघटनेच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.

About The Author