राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभिया चव्हाण यांच्या उपस्थितीत गोर सेना संघटना चाकूर तालुक्याची कार्यकारीणी जाहीर

राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभिया चव्हाण यांच्या उपस्थितीत गोर सेना संघटना चाकूर तालुक्याची कार्यकारीणी जाहीर

चाकूर (सुनिल जाधव) : आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.तरी पण आपला बंजारा समाज हा आतापर्यंत स्वातंत्र्य झालेला नाही म्हणून आपला गोर,बंजारा समाज हा पारतंत्र्यात आहे तर या माझ्या समाजाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अशी सिंहगर्जना गोर बंजारा समाजात ज्यांना आपण ढाण्या वाघ म्हणून ओळखतो ते म्हणजे गोर सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभिया चव्हाण ज्यांनी आपल्या समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करुन न्याय मिळावा यासाठी बंजारा समाजाचे महापीठ असलेल्या पोहरादेवी याठिकाणी शपथविधी घेतली की मी माझ्या आयुष्यात लग्न कधी करणार नाही आणि राजकारण कधी करणार नाही व समाजामध्ये राजकारण कसे करावे हे शिकवल्या शिवाय मी गप्प बसणार नाही अशी शपथ अरुणभिया चव्हाण यांनी घेतली आहे.समाजातील समस्या अडी अडचणी सोडविण्यासाठी रात्रीचा दिवस करुन परिश्रम घेत समाजातील युवा पिढीला एकत्रीत करुन गोर सेना संघटनेच्या वतीने बंजारा समाजाला न्याय कसा मिळत नाही यासाठी लढा लढण्यासाठी त्यांनी आपल्या गोर सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांना चाकूर येथील शासकीय विश्रामगृहात मोलाचे मार्गदर्शन केले.आज छत्रपती राजे म्हणून ओळखले जाणारे मराठा समाजातील सर्वात श्रेष्ठ जात असणारे पाटील,पांडे, देशमुख हे आज मराठा समाजाच्या आरक्षणाची भिक मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत तरी आपला बंजारा समाज हा तर कामगार वर्ग आहे मग आपला समाज डोंगर दरीत राहणारा समाज आहे मग या समाजाला आरक्षण नको का?डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणेच संघटीत व्हा आणि संघर्ष करा या ब्रीदवाक्या प्रमाणे आपल्या समाजातील लोकांनी एकजूटीने पाऊल उचलू असे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले,जर आपला बंजारा समाजातील ऊसतोड कामगार जर दोन वर्ष ऊसतोडणी नाही करायची म्हणून ठरवले तर कित्येक साखर कारखाने स्वताला साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे हे बंद पडल्याशिवाय राहणार नाही असे ठामपणे छाती ठोकून अरुणभिया यांनी सांगितले.चाकूर तालुक्यातील गोर सेना संघटनेची आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्वांना अरुणभिया चव्हाण यांच्या हस्ते पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.त्यामध्ये गोर सेना संघटनेच्या लातुर जिल्हा कमीटीवर जिल्हा संघटक म्हणून अनिल भानुदास राठोड यांची निवड करण्यात आली, तर गोर सेना संघटनेचे लातुर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख म्हणून श्री.सुनिल चंदर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.गोर सेना संघटनेच्या चाकूर तालुकाध्यक्ष पदी श्री.संतोष त्र्यंबक जाधव,मोहन लक्ष्मण चव्हाण गोर सेना चाकूर तालुका उपाध्यक्ष, शामराव अशोक जाधव चाकूर तालुका उपाध्यक्ष, प्रविण नामदेवराव पवार गोर सेना शहराध्यक्ष बाळू मोतीराम राठोड संयोजक गोरसिकवाडी, विकास उत्तम चव्हाण गोर सेना चाकुर तालुका सचिव, राहुल राजाराम राठोड सहसचिव गोरसेना चाकूर, सखाराम तात्याराव जाधव गोर सेना कोषाध्यक्ष चाकूर,सचिन गोविंद आडे उप कोषाध्यक्ष गोर सेना चाकूर,सचिन श्रीकांत जाधव गोर सेना चाकूर संघटक, अनिल मोहन राठोड गोर सेना सह संघटक चाकूर,संजय प्रेमदास चव्हाण गोर सेना संघटक चाकूर, मंगेश संजय आडे गोर सेना प्रसिध्दी प्रमुख चाकूर, ॲड.परशुराम नारायण राठोड विधी सल्लागार, अशाप्रकारे सर्व पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ॲड.राहूल राठोड प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य, ॲड.राजकूमार पवार गोर सेना लातुर जिल्हा उपाध्यक्ष, रवीभिया राठोड विभागीय प्रसिद्धी प्रमुख औरंगाबाद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

About The Author