साई फाउंडेशन व्‍दारा जिल्‍हयातील आशाताईना रियुजेबल सॅनिटरी पॅड आणि कोरोना प्रतिबंधात्‍मक कीटच्‍या वाटपाचा उदगीर मध्‍ये शुभारंभ

साई फाउंडेशन व्‍दारा जिल्‍हयातील आशाताईना रियुजेबल सॅनिटरी पॅड आणि कोरोना प्रतिबंधात्‍मक कीटच्‍या वाटपाचा उदगीर मध्‍ये शुभारंभ

उदगीर (प्रतिनिधी) : साई फाउंडेशन व्‍दारा जिल्‍हयातील सर्व आशाताईना दोन वर्ष वापरता येणारे रियुजेबल सॅनिटरी पॅड आणि  कोरोना प्रतिबंधात्‍मक कीट च्‍या वाटपाचा शुभारंभ उदगीर येथिल लाईफकेअर हॉस्पिटल येथे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी गंगाधर परगे आणि डॉ अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी बोलताना डॉ अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी सॅनेटरी पॅड अभावी महिलांना अनेक आरोग्‍य समस्‍याशी सामना करावा करावा लागतो . आशाताईना कामाच्‍या वेळात स्‍वत: कडे लक्ष देण्‍यासाठी वेळ मिळत नाही या दुर्लक्षामुळे कॅन्‍सर सारख्‍या आजार होउ शकतो यामुळे महिलानी आपल्‍या कुटुबासाठी स्‍वत कडे लक्ष देणे आवश्‍याक आहे असे यांनी सांगितले. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ गंगाधर परगे यांनी सर्व आशाताईनी स्‍वत: ची काळजी घेत आपले काम करावे असे सांगितले. यावेळी तालुका आारोग्‍य अधिकारी प्रशांत कापसे, मिलिंद घनपाठी डॉ अयुब पठाण उपस्थित होते.

About The Author