‘ग्रामस्पर्श’ लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा केंद्राचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक

'ग्रामस्पर्श' लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा केंद्राचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक

सताळा बु. (प्रतिनिधी) : ‘शिक्षणातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते’ या उक्तीला अनुसरून सताळा बु. या गावातील युवकांच्या पुढाकाराने ‘लोकसहभागातून’ स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाला स्पर्धा परीक्षेचे योग्य ते मार्गदर्शन लाभावे व एकाच ठिकाणी सर्व पुस्तके उपलब्ध व्हावीत या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व व उद्देश्य कपिलेश जळकोटे यांनी प्रस्तावनेतून मांडले. यावेळी गावचे सरपंच मा. शिवलिंगआप्पा जळकोटे यांच्या हस्ते रिबीन कापून या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सेनानी पंढरीनाथ तिरुके, उपसरपंच अरुणाताई देशपांडे, ग्रामसेवक संतोष माचेवाड  व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर राज्यमंत्री मा. नामदार संजयजी बनसोडे यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राला सदिच्छा भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शन केले. यावेळी रामचंद्र तिरुके, बस्वराज पाटील नागराळकार, चंद्रकांत टेंगेटोल व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी गजानन बालने, कपिलेश जळकोटे, व्यंकट तिरकोळे, अस्लम सय्यद, गुंडेराव जळकोटे, स्वप्निल तिरुके, पंकज बनसोडे, श्याम जळकोटे  व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

About The Author