कर्मचाऱ्यांच्या कुंटूंबीयास एकोणीस लाख ७ हजारआर्थिक मदतीचा धनादेश

कर्मचाऱ्यांच्या कुंटूंबीयास एकोणीस लाख ७ हजारआर्थिक मदतीचा धनादेश

मा. श्री. शरणजी पाटील साहेब संचालक यांच्या हस्ते सुपूर्व

मुरुम (प्रतिनिधी) : येथील श्री विठ्ठलसाई कारखान्यातील के. बाबाराव कदारे कृषि सहाय्यक यांचा कोरोना प्रादुभावामुळे दि.१४/०५/२०२१ रोजी निधन झाले. कारखान्याने अशा कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांबद्दल पूर्वी पासूनच सहानुभूतीचे धोरण ठेवून वेळोवेळी सढळ हाताने आर्थिक मदत केलेली आहे. याचाच भाग म्हणून कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बसवराजजी पाटील साहेब यांनी कदारे यांच्या कुंटूंबास आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मा. श्री. शरणजी पाटील साहेब कारखान्याचे संचालक, विरोधी पक्षनेते जि. प. उस्मानाबाद यांच्या हस्ते कदारे यांना मिळणारी रक्कम व कारखान्याकडून आर्थिक मदत मिळून असे एकूण रु. १९.०७ ( एकोणीस लाख ७ हजार) धनादेश त्यांच्या पत्नी श्रीमती. शिलादेवी बाबाराव कदारे यांना आज अचलेर येथे त्यांच्या घरी नेवून देण्यात आले. तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून के. कदारे यांच्या पत्नीला दरमहा रु. २६४६ फॅमिली पेन्शन व त्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी दरमहा रु. ६६२.०० प्रमाणे पेन्शन मंजूर करून घेण्यात आले आहे. या प्रसंगी मा. श्री. दत्ता पाटील संचालक डी. सी. सी. बँक उस्मानाबाद, श्री. प्रकाश लोखंडे सरपंच, श्री. सुभाष सोलंकर माजी सरपंच, परमेश्वर पटणे, शिवराज कमलापुरे, शिवपुत्र पाटील, सिध्दाराम पत्रिके, महादेव कदार. आप्पासाहेब कदारे, अचितानंद कुंभार, कल्लाप्पा गोपने कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बो. अथणी. चिफ अंकाउंटंट शत्रुघ्न देशमुख, कॅन अंकाउंटंट राजू पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!