लातूर येथे आकाशवाणी केंद्र मंजूर करा..!

लातूर येथे आकाशवाणी केंद्र मंजूर करा..!

डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे आकाशवाणीचे नव्याने स्वतंत्र केंद्र मंजूर करावे अशी आग्रही मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे तालूका सचिव युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी नूकतीच दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयाकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,लातूर जिल्हा हा सामाजिक राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक,कृषी,क्रीडा अशा विविध क्षेत्रात अग्रणी असून शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा लातूर पॅटर्न विकसीत केला आहे.
लातूर येथे आकाशवाणी केंद्र मंजूर व्हावे ही येथील जनतेची अनेक वर्षांपासून ची मागणी प्रलंबीत आहे.सध्याचे युग हे माहीती तंत्रज्ञानाचे आहे.माहितीची देवाण घेवाण ही महत्त्वपूर्ण बाब यातून साध्य होणार आहे. सदरचे केंद्र कार्यान्वीत झाल्या नंतर रेडिओच्या माध्यमातून येथील सांस्कृतिक क्षेत्राला गतिमानता येणार आहे.तसेच क्रीडा,कृषी,युवक कल्याण,आरोग्य आदी क्षेत्रातील लोकांसाठी आकाशवाणीच्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.जेणेकरून या क्षेत्रासाठी नवीदिशा मिळू शकणार आहे. आकाशवाणीचे स्वतंत्र केंद्र स्थापन करावे ही सबंध जिल्ह्याची जनभावना आहे.ही बाब लक्षात घेवून खास बाब म्हणून लातूर येथे नव्याने आकाशवाणी केंद्र मंजूर करावे असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

About The Author