संत ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे- हाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ.वर्षा भोसले, कोषाध्यक्षा शितल मालू,पालक मा.श्री.हेमंत नळेगावकर,निर्मला नळेगावकर, मुख्याध्यापक उद्धव श्रृंगारे, मुख्याध्यापक आशा रोडगे-तत्तापूरे, स्वपना हिंगणे, उकिरडे सर सह माजी विद्यार्थिनी अँड.अमेना शेख, अँड.सलमान शेख उपस्थित होते.यावेळी भाषण, निबंध, गीत गायन अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण गार्गी चंद्रशेखर नळेगावकर यांच्या वतीने करण्यात आले. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत 75 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे ही रोप देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी घोगरे यांनी केले तर आभार मीना तोवर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!