ई-पिक पाहणी पथदर्शी अॅपचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : आघाडी शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर कार्यान्वीत होत असून यासाठी वापरण्यात येणा-या ई-पीक पाहणीचा ॲन्ड्राईड मोबाईल ॲपचा माध्यमातून महाराष्ट्र राज्य पणन फेडरेशन महासंघाचे चेअरमन तथा चाकूर-अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी स्वतःच्या शेतातील पीक पाहणी स्वतः भरून प्रारंभ केला या वेळी तहीसलदार शिवानंदजी बिडवे,सुरजभैया पाटील आदी उपस्थित होत. ई-पीक पाहणी पथदर्शी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय महसूल विभागाने नुकताच घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील प्रसिध्द झाला आहे. याबाबत सर्व तलाठी व महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच कृषी सहाय्यक व कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी याच्या प्रसिद्धीसाठी व अंमलबजावणी साठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील माहिती या ई पीक पाहणी च्या ॲप मधून अँड्रॉइड मोबाईल च्या साह्याने करावी जेणेकरून शेतकऱ्यांना यापुढील सर्व योजनांचा लाभ सुरळीतपणे व सोप्या पद्धतीने घेता येईल तसेच पीक पेरा कृषी कर्ज इत्यादी बाबी ही अत्यंत सुलभतेने शेतकऱ्यांना उपलब्ध होतील असे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.