रस्ते कंत्राटदारांकडुन सक्तीच्या वसुलीमध्ये भाजपा आघाडीवर

रस्ते कंत्राटदारांकडुन सक्तीच्या वसुलीमध्ये भाजपा आघाडीवर

नितीन गडकरींना लवकरच यादी सोपवू – किशोर तिवारी
यवतमाळ (प्रतिनिधी) : रस्ते कंत्राटदारांकडून सक्तीच्या वसुलीमध्ये भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आघाडीवर असून त्यांची यादीच नितीन गडकरी यांना सुपूर्द करणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी दिली आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्ते टक्केवारी मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळे आणतात असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लिहिले आहे. एवढेच नव्हे तर हे पत्र माध्यमांमध्ये सार्वजनिक केले. या पत्राला भरपुर प्रसिद्धी मिळावी याची व्यवस्था केली. हा प्रकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेने भाजपशी संबंध तोडल्यानंतर घडत आहे. ज्याप्रकारे भाजपचे सर्व प्रवक्ते राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला सोनिया सेना किंवा शवसेना किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार असल्याचे बोलताना थकत नाहीत त्याचाच एक प्रकार असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. भारतात भाजपचे शेकडो लोकप्रतिनिधी व पदाधिकारी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर ठेके घेतात तसेच कामाच्या आधी टक्केवारी मिळाल्याशिवाय काम सुरु करू देत नसल्याचे दिसून आले आहे. भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जे वसुली करतात किंवा टोल चालवत आहेत त्यांची यादी जशी नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी पत्र सार्वचनिक केले आपणही करणार अशी माहीती शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आज दिली .
सन २०१४ ते २०१९ काळात नितीन गडकरींनीच महामहिम पंतप्रधानजींना पत्र लिहिले होते, पण त्या वेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कमिशन गोळा करून गुंडांचा वापर करून रस्त्यांचे बांधकाम थांबवणाऱ्या भाजप खासदार आणि आमदारांची यादी दिली होती. हा प्रकार राज्य स्तरावरील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करतात तसाच वाटतो. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच सर्व शिवसेनेतील नेते नितीन गडकरींचा आदर करतात. मात्र वाशीम येथील पोटभरू भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या खासदाराला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. यातुनच अपुऱ्या माहितीच्या आधारे हे सर्व घडल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे .
किशोर तिवारी यांनी म्हटले आहे “मी तुम्हाला 1975 पासून ओळखतो, आम्ही बराच काळ एकत्र काम केले आणि तुम्हाला भारत सरकारचे नेतृत्व मिळावे अशी मागणी नेहमीच करत आलो आहे. त्यामुळेच मी २०१२ ते २०१९ पर्यंत भाजप सोबत काम केले. माझ्या या मागणीमुळे आपणास भाजपमध्ये त्रास झाला, मी तुम्हाला वर्षातील ३६५ दिवस २४ तास काम करतांना पाहिले आहे. व यासाठीच पुज्यनीय बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला रोडकरी म्हटले होते व माननीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत सरकारच्या ग्रामीण व राष्ट्रीय रस्त्यांचे जाळे विनण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स वर नियुक्त करून प्रमाणीत केले होते. मात्र आपल्या पत्रामुळे मागील २८ वर्षांपासून खासदार असलेल्या व संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांना दिलेल्या महिला लोकप्रतिनिधीची बदनामी झाली आहे. विशेष म्हणजे उच्चं विद्याविभूषित असलेल्या भावनाताई या तुम्हाला उद्धवजी नंतर सर्वाधिक मान देतात असे असतांना एकतर्फी बाजु एकूण लिहलेल्या पत्राने त्यांचा अनादर झाल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

कार्यकर्ते बनले ठेकेदार

नितीन गडकरी हे २०१४ नंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी ठेकेदारी सुरु केली. या नेत्यांच्या कंपन्यांनी सब कंत्राट वाटले तसेच अनेक ठिकाणी रस्ते गुणवत्ता सोडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविल्याने वाद निर्माण झाला आहे. यामध्ये दिवाळखोर कंपनी वा कोणताही अनुभव नसताना फक्त भाजपाचे कार्यकर्ते आणि खासदार, आमदार यांना पोसण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रीय रस्ते निर्माण प्राधिकरण ३ लाख कोटीच्या कर्जात आहे असा आरोपच किशोर तिवारी यांनी केला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!