तोंडचीर येथे सर्वरोगनिदान शिबिर संपन्न

तोंडचीर येथे सर्वरोगनिदान शिबिर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनानिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी,मधुमेह,रक्तदाब शिबीर व सर्वरोगनिदान  व उपचार शिबिराचे आयोजन तोंडचीर येथे करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री दीपक अरविंद कांबळे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक विनायक जाधव  (प्राचार्य शिवाजी महाविद्यालय),वसंत जाधव (सरपंच तोंडचीर), मनोजभाऊ चिखले ( सरपंच शेलाळ), श्री कांबळेजी (माजी मुख्याध्यापक बेलसकरगा) अनिल तोंडचिरकर,गिरीश पाटील उपस्थित होते.

या वेळी प्रमुख उपस्थिती सुमंगल हॉस्पिटलचे डॉ.विजय बिरादार , निखिलेश्वर क्लिनिकचे डॉ. व्यंकटेश वट्टमवार व मधुर डायबिटीज सुपरस्पेशालिटी चे डॉ. प्रशांत नवटक्के सर व अरविंद पत्की सर उपस्थित होते.शिबिरामध्ये १०२ रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले.कार्यक्रमामध्ये मधुमेह व रक्तदाबाविषयी डॉ.नवटक्के यांनी जनजागृती केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी तर आयोजन प्रदीप तोंडचिरकर, दशरथ जाधव, पुंडलिक जाधव, महादेव जाधव,सचिन कांबळे, रोहित कांबळे,संतोष जाधव, दत्ता जाधव, वीरभद्र जाधव, भरत जाधव यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव बिरादार,दीक्षित कांबळे, रितेश जाधव,अविनाश जाधव, वामन जाधव, आनंद जाधव, नामदेव जाधव, सूरज कांबळे, विजयकुमार जाधव, अनिल कांबळे व प्रदीप तोंडचिरकर यांच्या मित्रांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author