लष्करी अळी वर नियंत्रण करण्यासाठी कृषिदूत सरसावले 

लष्करी अळी वर नियंत्रण करण्यासाठी कृषिदूत सरसावले 

नाशिक/चांदोरी (रोहित टोंम्पे) : निफाड तालुक्यातील चांदोरी  या परिसरात लागवड झालेल्या मका, टोमॅटो, सोयाबीन या पिकाची पाहणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, यांचे संलग्न एच.एच एस.एस श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालया मालेगाव येथील विद्यार्थी प्रतीक भोज यांच्याकडून करण्यात आली .  यामध्ये मका पिकावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तसेच टोमॅटो पिकांवरील विविध किडीचे व अळी  याचा प्रादुर्भावातून वाचविन्यासाठी  शेतकऱ्यांना एकात्मिक किड नियंत्रणाच्या उपाय ही सुचविले. यामध्ये प्रामुख्याने जैविक नियंत्रण (कामगंध सापळ, प्रकाश सापळे) यांचा वापर करावा. तसेच निबोळी अर्क ५% याची फवारणी करावी. तसेच बांधावर एरंड या पिकाची लागवड करावी जेणेकरुन मका पिकावरील अळीचा प्रादुर्भाव कमी होईल. यामध्ये तूर, उडीद, मूग ई. आंतरपिक म्हणून लागवड करण्याचे सूचविले . तसेच टोमॅटो ,पिकाचे दररोज निरीक्षण घेण्यास सांगितले. 

यासह शेतीविषयक अनेक बाबींवर मार्गदर्शन केले. या अभ्यास दौऱ्यात एच.एच एस.एस श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत प्रतिक विजय भोज, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. तुरभटमठ, उपप्राचार्य डॉ. एस. एस. राऊत., डॉ. पि. के. सुर्यवंशी कार्यक्रमाचे समन्वय एस. बनसोडे, प्रो. एस. वि .बागल, प्रो. एस. के. उदमले यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

About The Author