मनुष्याच्या पूर्वीच वनस्पतींचा जन्म : ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

मनुष्याच्या पूर्वीच वनस्पतींचा जन्म : ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

उदगीर (प्रतिनिधी) : मनुष्याच्या जीवनात पशु व वनस्पतींचे महत्व मोठे आहे. मनुष्याच्या निर्मितीच्या अगोदरच वेगवेगळ्या वनस्पतींची निर्मिती झाली असल्याचे सांगत झाडांची लागवड ही पुढील पिढीसाठी एक महत्वपूर्ण देणगी राहणार असल्याचे मत ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले. उदगीर येथील संघर्ष मित्र मंडळ, श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळ व नारायणा ऍग्रो ऑईल प्रा. लि. द्वारा संचलित असलेल्या सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेच्या परिसरात राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, सिनेअभिनेते तथा सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे व ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते गोपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ह. भ. प. गहिनीनाथ महाराजऔसेकर  बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, ज्येष्ठ समाजसेवक रमेश अंबरखाने, पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे, मल्लिकार्जुन मानकरी, व्यंकटराव पाटील अवलकोंडेकर,  सोमनाथपुरचे सरपंच राम पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ह.भ.प. गहिनीनाथ महाराज म्हणाले की, आज अनेक पशु पक्षांचे असे जीव आहेत की, ते केवळ झाडाच्या पालापाचोळा खाऊन जगत असतात. त्यामुळे वृक्षाची लागवड व जपणूक आवश्यक आहे. वृक्षाची लागवड केवळ ते ऑक्सिजन देतात म्हणून करायची नसते तर झाडाशिवाय माणूस जगूच शकत नाही. म्हणून करायची असते. असे ही यावेळी ह. भ. प. औसेकर महाराज म्हणाले. यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी उदगीर तालुक्यात वृक्षलागवडीची चळवळ योग्य पद्धतीने राबविली जात असल्याबद्दल कौतुक करीत आगामी काळात हा देश झाडाचा देश म्हणून ओळखला जावा. याकरिता प्रत्येक व्यक्तीने वृक्षलागवड करून त्याची जोपासना करावी असे आवाहन केले.

राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या गोसेवेसाठी संघर्ष मित्र मंडळ, श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळ व नारायणा ऍग्रो ऑईलच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करीत या कामासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. सध्या उदगीर तालुक्यात वृक्षलागवडीची चळवळ चांगली राबविली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यमंत्री ना. बनसोडे यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत प्रतिपादित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश अंबरखाने यांनी केले. सूत्रसंचालन नरसिंग कंदले व अनिता यलमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोतीलाल डोईजोडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. गोरक्षण चे शिवयोगी तोंडारे  आप्पा ,संतोष  तोडकर, महादेव नवबदे ,काशिनाथ स्वामी , बाबू तोंडारे,  नारायणा ऍग्रोचे सागर महाजन, संघर्ष मित्रमंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्सश रामदास  जळकोटे,सुरेश अंबरखाने  प्रशांत मांगुळकर, नारायण वाकुडे, संतोष फुलारी, विजय मांगुळकर, गोपाळ मुक्कावार, अशोक आंबरखाने, अनिरुद्ध  गुरूडे, शिवकुमार  जाधव, इसाक भाई, शिवराज मुळे, सतीश तांदळे, जगदीश चौधरी, दत्ता वाकुडे,  राहुल धनाश्री, महेश गुरमे,  नारायण तळनीकर, तानाजी वाकुडे, गजानन चिद्रेवार, विशाल जैन, प्रमोद शेटकार, राजेश महाजन,  विक्रम हालकीकर,  शिवकुमार पाटील,  प्रतीक अंबरखाने, संजय  दुरुगकर, अभिषेक पत्तेवार, विजय खडकुरे, स्वप्निल ममदापुरे यांनी परिश्रम घेतले.

About The Author