सी.बी.सी.एस.च्या नवीन शिक्षणपध्दतीमुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होतील – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

सी.बी.सी.एस.च्या नवीन शिक्षणपध्दतीमुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होतील - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : आपल्या जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी 95 टक्क्यावर आहे. तर 30 विद्यार्थी 90 टक्क्याच्यावर गुण घेवून उर्तीर्ण झालेले आहेत.केंद्र शासनाने देशातील शिक्षण पध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन सी.बी.सी.एस.शिक्षण पध्दती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. शिक्षणातील सुधारणेसाठी या नवीन शिक्षण पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आपल्या संस्थेतही मानवता हाच धर्म व टॅलेंट हीच जात समजून गुणवत्ता जोपासण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे भविष्यात सी.बी.एस.ई.च्या नवीन शिक्षण पध्दतीमुळे जेएसपीएम संस्थेतून आदर्श विद्यार्थी निर्माण होतील. असे प्रतिपादन जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संस्था संचलित स्वामी विवेकानंंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सच्चिदानंद जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेचे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, उपप्राचार्य डॉ.आशा जोशी, इस्टेट मॅनेजर चंद्रशेखर पाटील, अराईज अकॅडमीचे मिश्रा, संपत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, जेएसपीएम संस्था ही गेल्या 38 वर्षापासून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारीत शिक्षणाद्वारे तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे काम अविरतपणे करीत आहे. देशामध्ये चांगले विचार देणारे अनेक महापरूष होऊन गेले. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम जेएसपीएम संस्था करीत आहे. सामाजिक जीवनामध्ये शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्‍त झालेले आहे. ब्रिटन, चीन अमेरिका या देशामध्ये संशोधनाला महत्त्व दिले जाते. सध्याचे युग हे बौध्दिक संपदेचे युग आहे. त्यामुळे बौध्दिक संपदेच्या जोरावर आपणांस नवनवीन संशोधन करता येते आपल्याकडे जगाच्या तुलनेत भारतातील तरूण हे अधिक हुशार आहेत. त्याला व्यवसायाची जोड नसल्यामुळे बरेच तरूण बेकारही आहेत. परंतु स्पर्धेच्या युगात शिक्षण व संशोधनाला महत्त्व देवून काम केल्यास त्या देशाची चौफेर प्रगती होते, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या सी.बी.एस.ई.बोर्डाच्या परीक्षेत रोहित नामदेव सवासे 98.60 टक्के गुण घेवून प्रथम, कांचन संजय हत्ते 98 टक्के गुण घेवून द्वितीय तर मैथीली विकास खर्चे या विद्यार्थिनीने 97.80 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. तसेच इयत्ता 12 वी मध्ये जेनिका कलाले 93.80 टक्के गुण घेवून प्रथम, श्रीहरी सुर्यवंशी 93.60 टक्के गुण घेवून द्वितीय तर अमृता सोनवणे ही विद्यार्थिनी 92.40 टक्के गुण घेवून तृतीय आली आहे. यासह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचाही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजरीाव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार उपप्राचार्य आशा जोशी यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.जयराम पॉल, दत्ता होळ, शिकन्या चव्हाण, दिपाली चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
70 वर्षानंतर सुरक्षा समितीचे अध्यक्षपद
आपल्याकडे ही कौतुकास्पद बाब
70 वर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जागतिक सुरक्षा समितीचे अध्यक्षपद आलेले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जगासमोर चांगली झालेली आहे. मोदी साहेबांच्या कामगिरीमुळे अरब कंट्रीमध्ये सुध्दा मंदिर बांधण्याची परवानगी मिळत आहे. ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टिने गौरवाची आहे. असे प्रतिपादन जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
प्रत्येकांच्या अंगी गुणवत्तेबरोबर माणुसकी हवी -अजितसिंह पाटील कव्हेकर
जेएसपीएम संस्थेअंतर्गत स्वामी विवेकानंद इंट्रिग्रेशन इंग्लिश स्कूलमधील इयत्ता 10 वी 12 विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून ही गुणवत्ता कायम ठेवण्याचे काम संस्थेने करावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून क्‍लासवन अधिकारी बनावे. त्याही पेक्षा डॉक्टर, इंजिनियर, आमदार, खासदार, मंत्री होण्यापेक्षा आपले जीवन सार्थक ठरण्यासाठी पहिल्यांदा एक चांगला माणूस बनने गरजेचे आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी गुणवत्तेबरोबर माणूसकी हवी असे प्रतिपादन जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.

About The Author