नागरी सुविधा मिळाव्यात – शासकीय आयटीआय कॉलेज परिसरातील नागरीकांची मागणी
उदगीर (प्रतीनिधी) : शहरातील देगलूर राडेवरील शासकीय आयटीआय कॉलेज परिसरातील पूर्व बाजूस नेहरू नगर, शिवार महादेव मंदीर, यासह आजूबाजुला नागरी वस्तीत वाढ होत असल्याने व अनेक दिवसापासून वास्तव्यास असलेले नागरी वसाहतीत नागरीक सुविधा अभावी हेळसांड होत असून या परिसराचा न.प. हद्द वाढीत समावेश झाल्याने या भागात नगर परिषद तर्फे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी न.प. मुख्याधिकारी व सर्व संबंधीतांकडे केली आहे.
गत अनेक वर्षापासून या परिसरात अनेक कुटूंब राहातात मात्र यापूर्वी न.प. हद्दी बाहेरील असा मालमत्तेवर उल्लेख करून बांधकाम परवानेही प्रलंबीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे या परिसरातील नागरीकांनी खालील मागण्याचे निवेदन राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, उपजिल्हाधिकारी उदगीर, तहसिलदार, इ. ना. देण्यात आले आहे.
हद्द वाढीत न.प. हद्दीत समावेश झाल्याची नोंद मालमत्ता, नमुना न. 8 वर करून देणे, नागरी वसहातीत स्ट्रीट लाईट चालू करणे, रस्ता व नालीचे काम करणे, पाण्याची सोय (नळयोजना) उपलब्ध करून देणे, घंटागाडीची व्यवस्था करणे, परिसरातील सर्व मतदारांची न.प. मतदार यादीत नोंद घेणे, इ. मागण्यांचे निवेदन परिसरातील असंख्य नागरीकांच्या सह्यासह देण्यात आले. यावेळी संपत कांबळे, हरीबा पिंपळे, सत्यवान भोसले, संदिप कामंत, राजेंद्र रोडेवाड, राम बिरादार, शाम खिडसे, मनोहर येलमेवाड, गुरूलिंग मठपती, ऍ़ड. संजय कपाळे, राजेंद्र भालेराव, साहेबराव सोळंके, इ. सह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.