कॉंग्रेस पक्षाचे विचार व आघाडी सरकारच्या विकासाच्या योजना मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात घेवून जाण्याचा प्रयत्न करणार

कॉंग्रेस पक्षाचे विचार व आघाडी सरकारच्या विकासाच्या योजना मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात घेवून जाण्याचा प्रयत्न करणार

काँग्रेस मीडिया जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी

चाकुर (प्रतिनिधी) : राज्यातील आघाडी सरकारच्या नवीन योजना व कॉंग्रेस पक्षाचे विचार जिल्यातील ग्रामीण भागात घेवून जाण्याचा प्रयत्न मीडियाच्या माध्यमातून करणार असून राज्याचे वैधकिय शिक्षण मंत्री नामदार अमित देशमुख, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी जो विश्वास दाखवून पून्हा मीडिया जिल्हाध्यक्ष म्हणून संधी दिली त्या संधीचे सोने करून जिल्यातील ग्रामीण भागात काँग्रेस ची विकासाची पताका घेऊन जाणार आहे असे मनोगत जिल्हा काँग्रेस मिडिया विभागाचे नूतन जिल्हाध्यक्ष हारिराम कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते रविवारी चाकुर तालुक्यांतील
घरणी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे अहमदपूर विधानसभा अध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला त्यावेळी कुलकर्णी बोलत होते.

पुढे बोलताना कुलकर्णी म्हनाले की राज्यातील आघाडी सरकारने नवीन विविध योजना सुरू केल्या आहेत एक वर्ष झाले सत्ता स्थापन झाली मात्र कोविड १९ मुळे या सरकाराने इतर कुठेही निधी न वापरता प्रथम प्राधान्य आरोग्य विभाग व शेतकऱ्यांना कर्ज माफी, अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिली आहे राज्य सरकारने कोरोणा च्या काळात अनेकांचे जीव वाचवण्यासाठी या सरकारने मोठ्या प्रमाणात कार्य करीत राज्यातील जनतेला महामारीच्या संकटातून बाहेर काढले असले तरी अजूनही थोडया प्रमाणात कोरोना कमी जास्त होत आहे राज्य सरकार काळजी घेत आहे आपणही स्वतः ची काळजी घ्यावी मास्क वापरा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्तविक चेअरमन राजकुमार पाटील यांनी केले घरणीचे उपसरपंच अँड संपतराव मानुरे यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक जीवाजीराव शिंदे-पाटील, संभाजी शिंदे- पाटील, शरद शिंदे, प्रशांत तोरे, श्लोक शिंदे उपस्थित होते.

About The Author