महाराष्ट्र स्थरावरील आवार्ड मिळवण्यासाठी स्मार्ट व्हिलेज पॅनलला विजयी करा – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

महाराष्ट्र स्थरावरील आवार्ड मिळवण्यासाठी स्मार्ट व्हिलेज पॅनलला विजयी करा - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर (प्रतिनिधी) : स्मार्ट व्हिलेज ही योजना आपण लातूर जिल्हापरिषदेला दिली होती, त्याची अंमलबजावणी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभा पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे कव्हा गावासहीत संपूर्ण जिल्ह्यात केली. त्यामुळे जिल्हा परिषदेला विविध योजनेसाठी देश व राज्य पातळीवरील पारितोषिके मिळाली. या योजनेचा लाभ घेवून कव्हा ग्रामपंचायतीने केंद्र, राज्य व जिल्हा परिषद स्थरावरील सार्वजनिक, वैयक्‍तिक, विकासाच्या योजना राबविल्या. त्यामुळे कव्हा ग्रामपंचायतीला जिल्हा स्थरावरील पारितोषिके मिळाली. तो आता राज्यस्थरावरील मिळवण्यासाठी स्मार्ट व्हिलेज विकास पॅनलला अभूतपुर्व मतांनी विजयी करा, असे आवाहन गुमास्ता कॉलनी, संभाजी नगर येथील भव्य सभेमध्ये मा.आ. व कव्हा स्मार्ट व्हिलेजचे जनक शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी प्रा.गोविंदराव घार, नगरसेवक अजितसिंह पाटील, निळकंठराव पवार, सुभाषअप्पा सुलगुडले, किशोर घार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, कव्हा गावचा विकास हा कव्हा गावचे वैभव राज्यात वाढविणारा झाला आहे. ज्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना, वैद्यकीय दवाखाना, विभागीय स्टेंडीयम, दलीत वस्तीमध्ये नाना-नाणी पार्क, राजीव नगर, संभाजी नगर, येरीगेशन कॉलनीची सुंदर व सुविधायुक्‍त उभारणी तंटामुक्‍त बक्षीस, टंचाईमुक्‍त निर्मलग्राम, तावरजा नदीचे जलयुक्‍तचे कामे, मराठवाड्यात सर्वोत्कृष्ठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सर्वांना स्वच्छतागृह, आर.ओ.प्लांटचे पाणी, घरकुल योजना, अशा कितीतरी विकास योजना राबवल्या आहेत. त्या अधिक राबवून गावाला राज्यस्थरावरील पारितोषिके मिळवून देण्यासाठी स्मार्ट व्हिलेजला विजयी करा. कव्हा गावची निवडणूक अनेकवेळा बिरविरोध केली. यावेळीही बिनविरोधच व्हावी, असा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. पंरतु काही लोकांच्या हेकेखोपरपणामुळे ते झाले नाही. त्यामुळे अशा लोकांना खड्यासारखे या निवडणुकीत बाजुला सारा. असेही शेवटी बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले.
गावाला एकसंघ ठेवण्यासाठी स्मार्ट व्हिलेज पॅनलला विजयी करा- प्रा.गोविंद घार

कव्हा गावच्या विकासाचे स्वप्न शिवाजीराव पाटील कव्हेकर व सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण होत आहे.गावची ग्रांमपंचायत अनेकदा बिनविरोध काढली यावेळेसही बिनविरोध काढण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न होता. परंतु काही लोकामुळे ती निघाली नाही. कव्हा गावची प्रतिमा जिल्ह्यात भांडखोर गाव म्हणून निर्माण झाली होती, ती बदलून विकासाचे ग्राम म्हणून कव्हा गाव जिल्ह्यात पुढे आले आहे. या कामी सर्व गट, पक्ष बाजूला ठेवून आम्ही विकासासाठी एकत्र येऊन कार्य करत आहोत. त्यामुळे गावात विकासातून निर्माण झालेला एकंसघपणा कायम ठेवण्यासाठी स्मार्ट व्हिलेज पॅनलला विजय करा. असे आवाहन प्रा.गोविंद घार यांनी केले.

गावाच्या ऐतिहासिक विकासकामाची पावती मतदानातून द्यावी-अजितसिंह पाटील कव्हेकर
कव्हा गावाचा ऐतिहासिक विकास मा.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब व गावकर्‍यामुळे घडला आहे. 35 वर्षातील प्रत्येक विकासकामावर कव्हेकर साहेबांचे परिश्रम, तपश्‍चर्या जोडली गेली आहे. त्यांच्या कार्याला सर्व गावकर्‍यांची सदैव साथ मिळाली आहे. त्यामुळेच कव्हा गाव हे स्मार्ट व्हिलेज म्हणून राज्यात पुढे आले आहे. त्यामुळे गावाची विकास पावती ग्रामपंचायत निवडणुकीत मतपेटीतून ऐतिहासिक मतदान स्मार्ट व्हिलेज पॅनलला करून द्यावी, असे आवाहन अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवशरण थंबा यांनी केले तर आभार उमेदवार नामदेव मोमले यांनी मानले. यावेळी गोवर्धन कुटवाड, बळीराम चोपडे, विष्णू तिगीले, सोमनाथ नांगरे, शिवराज पवळे, डाके गुरूजी, सदाशिव सारगे, कांचन होळकर, पूनम सारगे, नेताजी मस्के, अनिता घोडके,नाजीमा पठाण, पुजा मामडगे, पद्मीनी सोदले आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author