उत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी म्हणून देविदास ससाणे यांचा सत्कार

उत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी म्हणून देविदास ससाणे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर येथील इंदिरा गांधी महिला बचत गट व त्रिशा महिला बचत गटाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी म्हणून देविदास गंगाराम ससाणे यांचा सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर भीमनगर येथील रहीवाशी असलेले देविदास गंगाराम ससाणे, भैयासाहेब भालेराव व संदिप शिंदे यांचा इंदिरा गांधी महिला बचत गट व त्रिशा महिला बचत गटाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घंटागाडीवर उत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी म्हणून नुकताच सत्कार करण्यात आला. कंत्राटी स्वच्छता कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देविदास ससाणे यांच्या अन्य दोंघाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी इंदिरा गांधी महिला बचत गटाच्या यास्मिन तांबोळी व तसेच सदस्या वनमाला ए. शिनगारे, अनिता लांडगे, रुपवती हामणे, छाया हामणे तसेच त्रिशा महिला बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी स्वामी आदींची उपस्थिती होती. त्यांच्या सत्काराबद्दल डॉ. सतिश ससाणे, अतुल ससाणे, आदित्य ससाणे, प्रा. बालाजी कारामुंगीकर, गणेश मदने, गोपिनाथ राजपंगे, चंद्रकांत राजपंगे, न.प. कर्मचारी दिलीप ससाणे, सिद्धार्थ आचार्य, शेख जिलानी, विशाल ससाणे, बाळु सोनकांबळे, धम्मानंद ढवळे, किरण वाघमारे, रानी गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!