हिवरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी?

हिवरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी?

महागाव (राम जाधव) : तालुक्यातील सर्वात मोठी असलेली हिवरा(संगम)ग्रामपंचायत निवडणुकीकडे राजकीय दृष्टीकोनातुन सर्वाच्या नजरा लागलेल्या दिसत आहे या ग्रामपंचायत वर आजतागायत साहेबराव पाटील यांची सलग ३०वर्षा पासुन त्यांच्या हाती सत्ता आहे या सत्तेच्या बालेकिल्ल्याला विरोधक खिंडार पाडतात काय हा चर्चेचा विषय सध्या मतदारात रंगु लागला आहे या वेळेस नव्यानेच शरद पाटील व राजु धोतरकर यांनी आपले न्यु परिवर्तन पॅनेल उतरवुन साहेबराव पाटील यांच्या पॅनल समोर तगडे आव्हान उभे केले आहे. यात कोन बाजी मारणार हे माञ मतदार राजाच ठरवेल यात तिळमात्र शंका नाही या ग्रामपंचायत मध्ये एकुण १३सदस्य निवडून द्यावयाचे आहे. प्रभाग क्रमांक १मध्ये १उमेदवार अविरोध आला आहे तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये २ उमेदवार अविरोध निवडून आले आहे. साहेबराव पाटील यांच्या एकता पॅनल मध्ये प्रभाग क्रमांक १मधुन सौ. अनिता जगदीश जामकर या अविरोध निवडून आल्या तर शे फिरोज शे रजाक हे निवडणुकीसाठी मैदानात उभे आहेत त्याच प्रमाणे प्रभाग क्रमांक २मधून अवधूत वानखेडे, सौ मिनाक्षी शिंदे, सौ. शोभा काळे, प्रभाग क्रमांक ३मधुन पंकज कदम, सौ आलंकावती कदम, सौ. जयश्री कदम प्रभाग क्रमांक ४मधुन किशोर घाटोळे, प्रमोद बोरूळकर, सौ. प्रतीभा लकडे, प्रभाग क्रमांक ५मधुन सौ. संगीता शंकर पवार व रमेश भुसारे हे अविरोध निवडून आले आहेत तर शरद पाटील व राजु धोतरकर यांच्या न्यु परिवर्तन पॅनल कडून वार्ड क्र.१मध्ये शरद पाटील कदम, वार्ड क्र.२मधुन अशोक पाटील, सौ. जयश्री विजय कदम, सौ. चंद्रकला मारोती टिळेवाड, वार्ड क्र३मधुन नितीन कदम, सौ. वैशाली कदम, सौ. प्रणिता कदम, वार्ड क्र.४मधुन राजु धोतरकर, अशोक पाटील कदम, सौ. मेघा बोरूळकर हे उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. तर मतदार राजा कोणाला कौल देणार हे येणाऱ्या काळात स्पष्ठ च होईल.

About The Author