सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास प्रतिबंध
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुमपान करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्यानुसार लातूर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकिय कार्यालय, कार्यालयीन परिसर, शासकीय व खाजगी आस्थापना, सर्व सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकिय व खाजगी शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनिमय आणि वाणिज्य उत्पादन, पुरवठा आणि वितरण (COTPA) अधिनियम, २००3 च्या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकिय कार्यालय, कार्यालयीन परिसर, शासकीय व खाजगी आस्थापना, सर्व सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकिय व खाजगी शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनिमय आणि जाणिज्य उत्पादन, पुरवठा आणि वितरण (COTPA) अधिनियम 2003 मधील कलम 4 च्या तरतुदीनुसार धुम्रपान करण्यास किंवा तंबाखू खावून थूंकण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.
उपरोक्त सर्व आस्थापना /सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान/ तंबाखू सेवन निषेध क्षेत्र, येथे धुम्रपान करणे कायदयाने गुन्हा आहे. उल्लंघन करणाऱ्यास रु. 200/- रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाईल.अशा प्रकारचे 60 सेमी x 45 सेमी आकाराचे फलक कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावण्यात यावेत. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, दंड वसुली तपशिलासह दरमहा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूर यांच्या ई-मेल आयडीवर (cslaturntcp@gmail.com) (csnrhmlatur@rediffmail.com )सादर करावे. शैक्षणिक संस्थांनी COTPA Act, 2003 च्या कलम 4 व 6 ब नुसार काटेकोर पालन करुन संस्थेच्या 100 यार्ड परिसरातील तंबाखू विक्री केंद्र प्रतिबंधासाठी कार्यवाही योग्य ती करावी. हॉटेल, पानशॉप, लॉज, व्यापारी, निवासी व्यवस्था असणाऱ्या या आस्थापना यांनी COTPA, 2003 च्या कलम 4 व 6 अ च्या तरतुदीनुसार काटेकोर अंमलबजावणी करावी.
या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी, आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल व सदरील कार्यक्रमाबाबत समन्वय ठेवण्यासाठी आपल्या अधिनस्त एका जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच दंड वसुलीची रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत कोषागारात 0210067201 या लेखाशिर्ष सांकेतांकमध्ये जम करावी, असे ही आदेशात नमुद केले आहे.