११ वी च्या १५ टॉप गुणवंत विद्यार्थ्याना टॅब वाटप
लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेचा पुढाकार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दिला होता शब्द
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेची खान असलेल्या लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने लॉकडाऊन काळात पालक विद्यार्थी मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पहिल्या १५ मुलांना शैक्षणिक अभ्यासासाठी टॅब देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी यानी केली होती त्याची तात्काळ अंमलबजावणी संस्थेच्या वतीने करण्यात येवून दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या ११ वी च्या पहिल्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने संस्थेच्या संचालक मंडळ कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, उपाध्यक्ष रमेश राठी, सचिव रमेश बियाणी व नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते विद्यार्थ्याना १५ टॅब वाटप करण्यात आले दरम्यान टॅब पाहून विद्यार्थ्याच्या व उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते यावेळी दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, दिनेश इन्नानी, दीनानाथ भुतडा, बालकिशन बांगड उपस्थित होते.
कार्यक्रमास दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके, पर्यवेक्षिका प्रा. अंजली बुरांडे, समन्वयक प्रा. सुभाष मोरे, दयानंद शिक्षण संस्थेचे माध्यम समन्वयक हरीराम कुलकर्णी, वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रसिध्दी विभागाच्या प्रा. ज्योती कुलकर्णी, पालक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अंजली बुरांडे यानी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुभाष मोरे यांनी मांडले कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.