सिद्धी शुगर साखर कारखाना येथे अत्याधुनिक गांडूळखत पथदर्शक प्रकल्पाचे उद्घाटन

सिद्धी शुगर साखर कारखाना येथे अत्याधुनिक गांडूळखत पथदर्शक प्रकल्पाचे उद्घाटन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याने अत्याधुनिक गांडूळ खत पथदर्शक प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पी जी होनराव, शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख ,माधव जाधव ,प्रशांत भोसले, दयानंद पाटील, कावल गुडेकर, पी. एल. मिटकर, आर व्ही शिंदे, वाय आर टाळे, संदीप पाटील, धनंजय पाटील, अरविंद कदम, संतोष कदम, हरिभाऊ पांचाळ आदी उपस्थित होते.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतीच सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ,जमिनीची सुपीकता वाढविणे, जमिनीची पाणी क्षमता वाढवणे साठी उपयोगाचे आहे. सध्या 15 बाय 4 चे दोन हौद तयार करून दोन टन प्रति महा खत निर्मिती करणे व गांडूळ प्रति हौद पाच किलो गांडूळ सोडले. आधुनिक पद्धतीचे गांडूळ खत पथदर्शी प्रकल्प बसविण्यात आले.

About The Author