आनंद जोपासणारी झाडं जोपासायला हवीत – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात ‘नव्या वर्षाची सुरुवात वृक्षांच्या सहवासात’ या अभिनव उपक्रमाची एन. एस. एस. विभागाकडून अंमलबजावणी.
अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्याला झाडे ऑक्सिजन देतात.आनंद देतात.आपलं दु:ख विसरून इतरांसाठी जगण्याचं बळ देतात. म्हणून झाडांचं संवर्धन करायला हवेत, ती जपायला हवीत, असे मत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार – पाटील यांनी व्यक्त केले. महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथील प्राध्यापकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या प्राध्यापकांचा वाढदिवस असेल त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयास एक वृक्ष भेट देण्याचा व महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभीष्टचिंतन करून यथोचित सन्मान करण्याचा अभिनव व आदर्श पायंडा निर्माण झाला आहे. नुकताच महाविद्यालयातील हिंदीचे सहाय्यक प्राध्यापक व एन. एस. एस.विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.पांडुरंग चिलगर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. व ‘नव्या वर्षाची सुरुवात वृक्षांच्या सहवासात’ या अभिनव कार्यक्रमाची घोषणा एन. एस. एस. विभागाकडून करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार- पाटील हे बोलत होते.
नव्या वर्षाची सुरुवात ‘वृक्षांच्या सहवासात’ ही संकल्पना महात्मा फुले महाविद्यालयात राबविली जात आहे.वृक्षांचे आपल्यावर अनंत कोटी उपकार आहेत.तसेच आई -वडिलांचे प्रतीक म्हणून वृक्ष, पिंपळ या सह इतर वृक्षांची लागवड करणे व त्यांची वाढ करणे,तसेच त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,असेही ते म्हणाले. कोणताही समारंभ असेल तर झाड लावायला हवे.वाढदिवस किंवा इतर आनंदाचा क्षण असेल तर झाड लावून तो साजरा करायला हवा. त्या क्षणाची आठवण म्हणून ते झाड कायम आपल्याला ऑक्सिजन देईल असे उपक्रम ठिकठिकाणी व्हायला हवीत,असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रा. डॉ.बब्रुवान मोरे, डॉ.सतीश ससाणे, डॉ.अनिल मुंढे, डॉ.नागराज मुळे, ग्रंथपाल प्रा.पी.एम.इंगळे, डॉ. ए. एस.मोरे, डॉ. पी.पी.चौकटे, डॉ. डी. एन. माने, डॉ. पी.बी. बिरादार , डॉ. एस.एच. गर्जे, डॉ. मारोती कसाब , प्रा. ए. सी. आकडे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापुरे,शिवाजी चोपडे आदिंची उपस्थिती होती.