आशांनी साजरा केला आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांच्या समवेत रक्षाबंधन

आशांनी साजरा केला आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांच्या समवेत रक्षाबंधन

नाशिक/निफाड ( आकाश शेटे ) : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना,घरोघरी जाऊन सर्वेक्षण,औषध वाटप,आरोग्य तपासणी,कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करण्याचे काम आशा सेविकांनी केले.चांदोरी येथील रत्ना शिरसाठ, अनिता आंबोरे,संगीता वारघडे, मीना गडाख या आशांनी चांदोरी सह जिल्हाभरात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सेवाकार्य करणाऱ्या सदस्यांना चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार दि २२ रोजी राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला.सागर गडाख यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, वैद्यकीय अधिकारी डॉ मुकुंद सवई,अनिल भोर,अध्यक्ष सागर गडाख,सोमनाथ गडाख,गोकुळ टर्ले,आकाश गायखे,सुभाष फुलारे, केशव झुर्डे,अजय चारोस्कर,विलास गांगुर्डे,विलास गडाख,आशिष गायखे,पुष्कर भन्साळी,सचिन कांबळे,वैभव उफाडे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांचे दातृत्व

कोरोनाने अनेक महिला भगिनी विधवा झाल्या आहेत.त्यात चांदोरी जिल्हा परिषद गटातील या महिलांच्या आयुष्यात एकटेपणाची भावना निर्माण झाली आहे.या भगिनींना आधार देत सिद्धार्थ वनारसे यांनी रक्षाबंधन साजरा करत त्यांच्या मुलांची १० वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत भावाचे कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला.

About The Author