समाजकार्यासाठी सक्रियपणे कार्य करणार – प्रिती चंद्रशेखर भोसले

समाजकार्यासाठी सक्रियपणे कार्य करणार - प्रिती चंद्रशेखर भोसले

उदगीर (एल. पी. उगिले) : लोकनेते चंद्रशेखर भोसले त्यांच्या अकाली जाण्याने अनेक कार्यकर्ते इतरत्र भटकत आहेत. साहेबांची कमी कार्यकर्त्यांना जाणवू लागली आहे. सामाजिक कार्यामध्ये साहेब ज्या अग्रेसर पद्धतीने पुढे यायचे, तोच वसा आणि वारसा जपण्यासाठी मी सक्रियपणे पुढे येणार आहे. असे उद्गार लोकनेते चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रिती चंद्रशेखर भोसले यांनी व्यक्त केले. वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी शुभेच्छा देऊन आपल्या वरचे आणि साहेबा वरचे प्रेम दाखवून दिले आहे. साहेबांची कमी कार्यकर्त्यांना जाणू देणार नाही. त्यासाठी आपण सक्रिय होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, दलित पॅंथर, आझाद समाज पार्टी अशा विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रीती भोसले यांना प्रत्यक्ष भेटून समाज माध्यमावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव केला. मोठ्या प्रमाणात साजरा झालेल्या या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रीती भोसले यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी प्रामुख्याने सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापूरे, आशिष अंबरखाने, शशिकांत बनसोडे, शरद पाटील, अमोल घुमाडे, मदन पाटील, धनाजी जाधव, सर्जेराव भांगे, व्यंकट पेठे, संतोष बिरादार, सतीश पाटील मानकीकर, विवेक सुकणे, शिवाजीराव देवनाळे, फुले काका, सुरेश बोडके, अविनाश सूर्यवंशी, अरुण उजेडकर, पंकज कांबळे, धनाजी बनसोडे, राम बिरादार, श्रीकांत पाटील, राजेश्वर पटवारी, विनोद उगिले, महेश मठपती, शिवाजी पाटील, सुनील सावळे, किरण कांबळे, राहुल पाटील मलकापूरकर, शहाजी पाटील तळेगावकर, गजानन साताळकर, बाळासाहेब पाटोदे, उत्तरा कलबुर्गे, विश्वजीत पाटील मोर्तळवाडीकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून, समाज माध्यमावर, दूरध्वनीद्वारे प्रीती भोसले यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या प्रमाणात झालेल्या या वाढदिवसा मुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्यामुळे स्वतः प्रिती भोसले यांनी स्पष्ट केले की, आपण केवळ समाजसेवेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सक्रिय होत आहोत. यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. सर्वच पक्षातील कार्यकर्ते साहेबांवर प्रेम करत होते. त्या कार्यकर्त्यांना कुठे अडचण आल्यास आपण समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे ठरवले आहे. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

चौकट….
चंद्रशेखर भोसले यांची सुकन्या प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय झाल्यास महाआघाडीला सहकार्य होईल, आणि मग भारतीय जनता पार्टीचे काय? असा प्रश्न निर्माण होईल, म्हणून राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे.

About The Author