डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय समाजावर मोठे उपकार – पुज्य भंते महाविरो

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय समाजावर मोठे उपकार - पुज्य भंते महाविरो

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील नागारीकांना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूभाव ही मूल्य देवून येथील भारतीय समाजावर मोठे उपकार केले आहेत असे प्रतिपादन बौध्द धम्म गूरू पुज्य भन्ते महाविरोजी यांनी केले. मौजे माळेगांव ता.लोहा जि.नांदेड येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील, युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, पं.स.सदस्य बालाजी राठोड, अहमदपूर पं.स.चे कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, अजय भालेराव, चंद्रकांत कांबळे, सरपंच हनमंत धूळगूंडे, उपसरपंच बालाजी नावंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुरूवातीला बौध्द विहार येथे नव्याने तथागत गौतम बुध्द,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आल्या.या वेळी पू.भंते महाविरोजी यांनी त्रीशरण पंचशिल दिले.त्या नंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नविन स्थापन करण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर या पुतळ्यासाठी आर्थीक मदत केलेल्या व्यक्तींचा येथे सत्कार करण्यात आला. त्या नंतर भंतेजींनी धममदेसना करताना इतर धर्मीयांचा द्वेष करणे म्हणजे आपला धर्म श्रेष्ठ होत नाही. त्यामूळे आपले वर्तन हे महत्वाचे आहे. जगाला आज खर्या अर्थाने तथागताच्या शांतीच्या धम्माची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या सोहळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरीक अबाल वृध्दांची उपस्थिती होती.

About The Author