अभिनव विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रमातून आमचा भाऊ धनुभाऊ या संकल्पनेतून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विद्यार्थीनींनी पाठवल्या 551 राख्या
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली हिन्दू संस्कृतीमधील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन आयोजीत करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सहशिक्षिका सविता जंगले व प्रमुख अतिथी सहशिक्षक निलेश व्हावळे विशेष अतिथी म्हणून संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यकमाची सुरवात विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या पुजनाने झाली. या कार्यकमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहशिक्षिका ज्योती शिंदे यांनी मांडले यावेळी वर्ग दहावीतील विद्यार्थिनी कु. अनामताज शेख, पुनम देवकर, राजेश्री गुट्टे, वैष्णवी गिराम, खुशी होळकर, रागिनी बोकन या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्यानंतर वर्ग दहावीच्या विद्यार्थिनींनी आपला वर्ग बांधवांना राख्या बांधून मोठया उत्साहात हा सण साजरा केला त्यानंतर सर्व महिला शिक्षक भगिनी यांनी सर्व शिक्षक बांधवांना राखी बांधली सर्व विद्यार्थीनी यांनी कार्यकमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी व संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे यांच्याकडे आमचा भाऊ धनुभाऊ या संकल्पनेतून बीड जिल्हयाचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा. ना. धनंजय मुंडे साहेब यांना पाठवण्यासाठी सुमारे 551राख्या सुपुर्द केल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक गणेश भोसले यांनी केले तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार सहशिक्षिका समुद्रे मॅडम यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व शिक्षिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.