महिला पोलीस सीमा बनसोडे यांची विशेष कामगिरी
मुंबई : श्वेता रामेश्वर भोसले ही महिला गेली पंधरा वर्षे झाले ठाणे या भागात राहत होती सदरील महिला या दि. 5 जानेवारी रोजी शौचालयस जाते असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. त्या 07 जानेवारी रोजी हरवली असल्याची तक्रार वाळजे इस्टेट पोलीस ठाणे याठिकाणी देण्यात आली होती. श्वेता रामेश्वर भोसले (वय 22) या दि. 10 जानेवारी रोजी या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दांगट पाटील नगर शिवणे याठिकाणी एल.पी.सी. सीमा भीमराव बनसोडे विशेष शाखा हद्दीत माहिती घेत असताना सदरील महिला यांच्या हाती लागल्या. त्या महिलेची चौकशी केली असता त्यांनी दांगट नगर येथे लाईट लाईन कंपनी मध्ये नोकरी साठी आले असल्याचे सांगितले. त्या घरातून काही न सांगता परस्पर मुंबईहुन पुणे येथे निघून आलेल्या होत्या. त्यांना समजावून सांगून. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून नातेवाईकांना बोलावून घेऊन माहिती देऊन सदर बाबत हकीगत समजावून सांगून वारजे पोलीस स्टेशन येथे हजर करून सहाय्यक पोलीस निरक्षक आर. व्ही. शेवटे साहेब यांना त्यांच्या समक्ष हकीकत सांगून. सदर व्यक्ती ची स्टेशन डायरी करून सदर महिलेस तिच्या नातेवाईकांबरोबर रवाना करण्यात आले. सदर कार्यवाहीत वागळे इस्टेट पोलिस स्टेशन ठाणे यांनी काम पाहिले.