अभिनव भारत प्रतिष्ठान चे रक्तदान शिबिर संपन्न

अभिनव भारत प्रतिष्ठान चे रक्तदान शिबिर संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिनव भारत प्रतिष्ठान च्या वतीने दि. 10 जानेवारी रोजी रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. अभिनव भारत प्रतिष्ठान नांदगाव व श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे हे दुसरे व या वर्षांतील पहिले रक्तदान शिबीर असून यात 19 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरुवात डाॅ. राजाभाऊ माने यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पाटील व कैलास पाटील यांनी केले. कार्यक्रमास हनुमंत ढमाले व शालिग्राम पोतदार आवर्जुन उपस्थित होते. तसेच बालाजी चिगुरे यांनी सर्व उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

अभिनव भारत प्रतिष्ठान चे रक्तदान शिबिर संपन्न

यावेळी या रक्तदान शिबीरात चिगुरे गोविंद, शरिफ शेख, ज्ञानेश्वर घोडके, शिवाजी माने, बालाजी चिगुरे, अनंत ढमाले, अमोल कळबंडे, राम ढमाले, बालाजी गोबाडे, अविनाश जगताप, अनंत कोटिवाले, नारायण सगर, गजिले हरिश्चंद्र, महादेव काळुंके, शिवलिंग स्वामी, दत्तात्रय येरमुळे, आनंद पाटील, कैलास माने व राजाभाऊ माने यांच्यासह एकूण 19 जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला. या शिबीरात रक्तपेढीचे कर्मचारी डॉ. बी. डी. दाताळ, श्री. एस. जी. जवादे, श्री. ए. टी. वाघचवरे, श्री. ए. पाटील, श्री. दत्ता गोरे व सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक जानराव यांनी कष्ट घेतले. प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजाभाऊ माने यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास माने, भागवत माने, शैलेश ढमाले व अनिकेत माने यांनी प्रयत्न केले.

About The Author