वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पिंपरी चिंचवड समूहातर्फे रेकॉर्ड ब्रेक ८०३ रक्त पिशव्यांचे संकलन

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पिंपरी चिंचवड समूहातर्फे रेकॉर्ड ब्रेक ८०३ रक्त पिशव्यांचे संकलन

पुणे/पिंपरी चिंचवड (केशव नवले) : “रक्त दान – श्रेष्ठ दान”,”आपण रक्तदान करायला याच, परंतु येताना आपले कुटुंब, मित्रपरिवार यांना सुद्धा सोबत घेऊन येऊन रक्तदान करावे, असे आव्हान करत दिनांक १० जानेवारी रोजी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पिंपरी चिंचवड समूहा तर्फे भव्य रक्तदान शिबिरात ८०३ रक्त दात्यानी रक्तादान करत नवीन रेकॉर्ड करत राज्यात नव्हे तर जगात एक आदर्श निर्माण केला आहे. मागील साधारण नऊ महिन्यांपासून कोविडच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे लाखो लोक बाधित झाले आहेत त्यांना वैद्यकीय सेवा देण्यात यंत्रणांना मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळेच सध्य परिस्थितीत महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये सर्वत्र रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. शासन, विविध हाॅस्पिटल्स, पक्ष, सामाजिक संस्था रक्तदान करण्यासंबंधी जनतेस आवाहन करत आहे. रक्ताची जास्त गरज आहे, या परिस्थितीची जाणीव ठेवत वर्ल्ड मराठा ऑर्गनिझाशन पिंपरी चिंचवड समूहाने जास्तीत जास्त रक्त संकलित करण्याचे ध्येय ठेवले. समूहातर्फे रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य असुन या कार्यात आपण स्वतः आणि इतरांनाही प्रेरित करावे, रक्तदान शिबिरात सहभागी व्हा आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे इतिहासाचे साक्षीदार बना असे आव्हान पिंपरी चिंचवडकरना केले.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पिंपरी चिंचवड समूहातर्फे रेकॉर्ड ब्रेक ८०३ रक्त पिशव्यांचे संकलन

या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद देत ८०३ नी रक्तदात्यांनी रक्तदान केले, आणि नवीन एक रेकॉर्ड तयार केले आहे. रक्तदान शिबीरात रक्तदात्याची पूर्ण काळीजी घेत, कोविडचे नियमांचे पालन करत व्यवस्थापन केले होते. जे नागरिक रक्तदान करायला आले होते पण वय जास्त, वजन कमी, हिमोग्लोबीन कमी इत्यादी कारणामुळे ज्यांना रक्तदान करता आले नाही अश्या सर्व नागरिकांचे व रक्त संकलनासाठी मदत करणाऱ्या सर्व स्वयं सेवकाचे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे आभार मानण्यात आले आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!