मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या नारायण राणेंवर कारवाई करा
शिवसेना उपजिल्हाप्रमुख दाने यांचे तहसीलदारांना निवेदन
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपशब्द वापरणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिने दाने यांनी वतीने तहसीलदार व पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी बेताल वक्तव्य केली. एका राज्याचा व पक्षाचा प्रमुख असणाऱ्या व्यक्तीविषयी कसे बोलावे? कोणते शब्द वापरावे ?याचे संकेत राणे यांनी पाळले नाहीत.राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणे म्हणजेच राज्यातील जनतेला अपशब्द वापरण्यासारखे आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली आहे. तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे बापू कुलकर्णी, चांदपाशा शेख, गजानन बोळंगे, जनार्दन बोळंगे, भगवान शिंदे, चेतन शिंदे आदींसह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.