अक्का महादेवी यांनी ईश्वर उपासना आणि समाजसेवा करून धार्मिक गौरव वाढवला. प्रा.सौ, निलांबिका हुनगुंद (बडीहवेली)
उदगीर (प्रतिनिधी) : अक्का महादेवी यांनी ब्रह्मचर्य व्रत स्विकारून ईश्वर उपासना व समाज सेवा करून धार्मिक गौरव वाढविला असे विचार प्रा.सौ. निलांबिका(हुंनगुंद)बडीहवेली यांनी व्यक्त केले.
वीरशैव समाज उदगीर च्या वतीने संग्राम स्मारक येथील अॅड धर्मवीर संग्रामप्पा शेटकार सभागृहामध्ये आयोजित 87वा वचन सप्ताहाचे तिसरे पुष्प प्रा.सौ. नीलंबिका (हुनगुंद)बडीहवेली यांनी वीर वैराग्य निधी अक्का महादेवी आणि वचन साहित्य या विषयावर आपले विचार व्यक्त केले. एक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम मोतीपवळे होते तर समाजाचे प्रतिनिधी म्हणून कोषाध्यक्ष सुभाष धनुरे ते उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर अॅड संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विचार व्यक्त करताना प्रा. सौ निलांबिका बडेहवेली यांनी अक्का महादेवी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले. अक्का महादेवी या संयम आणि सदाचाराचा तेजस्विनी होत्या संसार आणि धर्मसेवा दोन्ही एकत्र राहून होत नाही म्हणून इच्छेचे बलिदान देऊन त्यांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली ईश्वर हेच पती रूपात पाहिले तृष्णा आणी वासनेच्या घेऱ्यात अडकलेल्यांना याचे महत्त्व कळणार नाही . षडविकारावर विजय मिळवून त्यांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली ईश्वरालाच पतीच्या रूपात पाहिले अक्का महादेवी याच्यात ज्ञानाचा भांडार होता त्यांनी 430 वचन लिहिले असून भारतीय इतिहासातील नारी शक्ती होती पुरुषी वर्चस्वाला झुगारून त्यांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली अक्का महादेवी आपल्या वचनातून स्त्रियांच्या पुरुषी प्रवृत्ती विरुद्धचा संघर्ष आणि त्याचा त्रास व्यक्त केला अक्का महादेवी या भगवान शिवाच्या निष्ठावान भक्त होत्या मन, शरीर व आत्मा भगवान शिवाला समर्पित केले होते . वैराग्य वृत्ती स्वाकारलेल्यांनी उंच डोंगरावर जंगलात घर केल्यानंतर जंगली श्वापदांना भेऊन कसे चालेल ,समुद्राकाठी घर करून भरती पाण्याला भेऊन कसे चालेल, भरल्या बाजारांमध्ये घर करून शांतीची अपेक्षा कसे करता येईल तसेच इहलोका मध्ये जन्म घेतल्यानंतर समाजात निंदा स्तुतीची परवा करून कसे चालेल म्हणून कोणी काहीही म्हटले तरी मन समाधानी ठेवणे गरजेचे आहे असे अक्कामहादेवी यांनी आपल्या वचनातून बहुमोल असे विचारांची देण दिली आहे असे विचार प्रा. सौ. निलांबिका बडुहवेली यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात राम मोतीपवळे यांनी वीरशैव समाज उदगीर च्या वतीने गेली 87 वर्षापासून पचन सप्ताहाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजात रुजवण्याचे कार्य करत आहे. वचन सप्ताहाच्या माध्यमातून नामवंत अशा भक्तांचे व्याख्याने आयोजित करून बौद्धिक मेजवानी देण्याचे काम हे अभिनंदन असून या पुढील काळात अधिक चांगले वक्ते वचन सप्ताच्या माध्यमातून देऊन महात्मा बसवेश्वर यांचे विचार सर्वदूर पोहोचण्याचे काम करावे असे विचार व्यक्त केले.अक्का महादेवी, महात्मा बसवेश्वर त्याचबरोबर शरण शरणांची वचने शाळा महाविद्यालयातून स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन करून प्रत्येक घरात वचनांचे पारायण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली महात्म्यांचे विचार हे जाती धर्माच्या चौकटीत न ठेवता सर्व मानवजाती साठी आहेत असे विचार व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय उत्तराताई कलबुर्गे यांनी केला.कार्यक्रमाचे संचलन व आभार गुरुप्रसाद पांढरे यांनी मानले.